नादब्रह्मतर्फे रविवारी भरतनाट्यम प्रस्तुती
सातारा
येथील नादब्रह्म नृत्यसंस्था यांच्यातर्फे रविवार दिनांक 27 जुलै रोजी शाहू कला मंदिर येथे भरतनाट्यम प्रस्तुती प्रवाह २०२५ हा कार्यक्रम होणार आहे नादब्रम्हच्या संचालिका नेहा राहुल घाडगे यांच्या संयोजनाखाली हा कार्यक्रम होणार असून यावेळी प्रमुख मान्यवर म्हणून भारतीय जनता पार्टी महिला मोर्चाच्या प्रदेश उपाध्यक्ष रेणू येळगावकर उपस्थित राहणार आहेत
हा कार्यक्रम विनामूल्य असून सर्वांनी या भरत नाट्यम प्रस्तुतीचा लाभ घ्यावा असे आवाहन स्नेहा घाडगे यांनी केले आहे

