श्रीनिवास देशपांडे यांचे निधन
सातारा
सातारा शहराच्या शाहूपुरी भागातील अंजली कॉलनीतील रहिवासी श्रीनिवास व्यंकटेश देशपांडे ( वय ९५) यांचे वृद्धापकाळाने नुकतेच राहत्या घरी निधन झाले.
त्यांच्या पार्थिवावर कैलास स्मशानभूमी , संगम माहुली येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या मागे पत्नी श्रीमती जानकीबाई , चार विवाहित मुली , जावई , सतिश , सुनील व दिपक ही. तीन मुले , सुना, नातवंडे , पतवंडे असा परिवार आहे.
युनायटेड वेस्टर्न बँकेमध्ये शाखा अधिकारी या पदावरुन ते सेवानिवृत्त झाले होते. नोकरीच्या कालावधीत ते मुलुंड , गोरेगाव- माणगाव , टेंभुर्णी, बार्शी , आष्टा , पहुर , सातारा या युनायटेड वेस्टर्न बँकेच्या शाखातून त्यांनी शाखा व्यवस्थापक म्हणून काम केले आहे. त्यांच्या विवाहाला ही नुकतीच 72 वर्षे पूर्ण झाली होती. मूळचे कर्नाटकातील जमखंडी येथील ते होते. मात्र त्यांनी नोकरी महाराष्ट्रातच केली. राष्ट्र सेवा दलाशी ते विद्यार्थी दशेत असताना संबंधित होते.
ज्येष्ठ नागरिक संघ सातारा याचे ते संस्थापक सदस्यांपैकी एक सदस्य होते.
सातारा येथील पत्रकार विजय मांडके यांचे ते सासरे होते.

