आध्यात्म हे एक परिपूर्ण शास्त्र
ज्ञानयज्ञ उपक्रमात डॉ सुभाष आगाशे यांचे प्रतिपादन
सातारा
आध्यात्म हे एक परिपूर्ण शास्त्र आहे आणि या शास्त्राचा योग्य अभ्यास करून सुख शांती समाधान मिळवता येते असे प्रतिपादन डॉ सुभाष आगाशे यांनी केले
बाळासाहेब शिवदे यांच्या जन्मशताब्दी सांगत्यानिमित्त आयोजित ज्ञानयज्ञ उपक्रमात आध्यात्म म्हणजे काय या विषयावरील प्रवचनात ते बोलत होते
डॉ सुभाष आगाशे म्हणाले भक्ती आणि आध्यात्म याबाबत अनेक गैरसमज आहेत पण भक्ती करणे किना आध्यात्म समजून घेणे हा अभ्यासाचा विषय आहे कारण हे एक परिपूर्ण शास्त्र आहे हे शास्त्र समजून घ्यायचे असेल तर गीता या ग्रंथाचा पाठयपुस्तक म्हणून वापर करायला हवा भगवान श्रीकृष्ण यांनी सांगितलेल्या गीतेमध्ये सर्व प्रकारचे तत्वज्ञान ठासून भरले आहे
गीतेतील तत्वज्ञान केवळ हिंदू धर्मासाठी नाही तर जगातील सर्व धर्म आणि विचारसरणी यांनाही गीतेतील तत्वज्ञानाचा फायदा होतो मनाचा शोध ईशवराचा शोध आणि मी चा शोध घेणे म्हणजे आध्यात्म होय आणि हा शोध कसा घ्यायचा याची शिकवण आपल्याला गीतेतून मिळते असेही डॉ सुभाष आगाशे म्हणाले
यावेळी डॉ सुभाष आगाशे म्हणाले यांनी काही दाखले देऊन हा शोध कसा घ्यायचा याचे विश्लेषण केले

आध्यात्म म्हणजे काय या विषयावरील हा ज्ञानयज्ञ १४ जूनपर्यंत चालू राहणार आहे
सायंकाळी सहा वाजता श्रद्धा बंगला पिरवाडी रोड येथे हि प्रवचनमाला सुरु आहे
