सोमवारी साताऱ्यात सर्वपक्षीय महामोर्चा – अशोकराव गायकवाड
सरन्यायाधीशांवर झालेल्या हल्ल्याविरोधात आंदोलन
सातारा
६ ऑक्टोबर २०२५ भारत देशाची सर्वोच न्यायपालिका असणारे सुप्रीम कोर्टाचे न्यायमूर्ती चिफ जस्टिस भूषण गवई यांच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न एका माथेफिरू तिवारी नामक वकिलाने केला. या गोष्टीचे पडसाद मागील ३ दिवसांपासून संपूर्ण राज्यात उमटताना दिसत आहेत. या अनुषंगाने साताऱ्यात पहिल्यांदाच आंबेडकरी व परिवर्तनवादी विचारांच्या शेकडो संघटना व त्यांचे पदाधिकारी एकत्र आले आणि त्यांनी या लोकशाही विरोधी कृत्याचा जोरदार निषेध करत सोमवार दिनांक १३ ऑक्टोबर रोजी महामोर्चाचे आयोजन केले आहे.
भारताचे संविधान निर्माते बोधिसत्व परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी निर्माण केलेली लोकशाही वाचवण्यासाठी आपापसातील मतभेद बाजूला ठेवू व संविधानाच्या संरक्षणासाठी एकत्र येऊ असा निर्धार प्रत्येकाने या बैठकीमध्ये व्यक्त केला.
संविधान व लोकशाहीसाठी वेळप्रसंगी आपल्या प्राणांची आहुती देऊ अशी शपथ या बैठकीमध्ये उपस्थित असणाऱ्या आंबेडकरी अनुयायांनी घेतली. या मोर्चाचे नेतृत्व सातारा जिल्ह्याचे जेष्ठ नेते अशोकराव बापू गायकवाड करतील असे सर्वानुमते ठरले आहे. हा मोर्चा पोवई नाक्यावरील श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला अभिवादन करून भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला अभिवादन करून मोती चौक मार्गे पुन्हा पोवई नाक्यावर येईल व त्या ठिकाणी या मोर्चाचे सभेत रूपांतर होऊन मोर्चामध्ये सहभागी असणाऱ्या सर्व संघटनांचे प्रमुख पदाधिकारी त्या ठिकाणी आपलं मनोगत व्यक्त करतील व सर्व प्रमुख पदाधिकाऱ्यांचे शिष्टमंडळ या घडलेल्या घटनेच्या निषेधाचे निवेदन जिल्हाधिकारी यांना देतील.
आंबेडकरी संविधान महामोर्चा असे या मोर्चाचे नाव असणार आहे.
महामोर्चा मध्ये प्रामुख्याने सहभागी असणाऱ्या संघटना रिपाई (आठवले) वंचित बहुजन आघाडी रिपाई (गवई) रिपाई (निकाळजे) रिपाई (कवाडे) बसपा राष्ट्रीय समाज पक्ष जनता क्रांती दल भारतीय बौद्ध महासभा समता सैनिक दल डीपी आय सर्व ओबीसी संघटना ऑल इंडिया मुस्लिम ऑर्गनायझेशन लेक लाडकी अभियान रिपब्लिकन सेना देशप्रेमी सामाजिक संघटना दलित महासंघ राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी प्रज्ञा सूर्य सामाजिक संघटना ऑल इंडिया पॅंथर सेना स्वाभिमानी शेतकरी संघटना या सर्व पक्षांच्या नेतृत्वाखाली मोर्चा संपन्न होणार आहे.
या बैठकीसाठी उपस्थित असणाऱ्या प्रमुख नेते श्री अशोकराव गायकवाड सौ वर्षाताई देशपांडे श्री दादासाहेब ओव्हाळ श्री गणेश भिसे श्री अरुण गाडे सर श्री विशाल भोसले श्री उमेश चव्हाण श्री सतीश गाडे श्री संजय गाडे श्री चंद्रकांत दादा कांबळे श्री स्वप्निल गायकवाड श्री अमर गायकवाड श्री श्रीकांत निकाळजे श्री रमेश गायकवाड श्री सुहास मोरे श्री आबासाहेब न्यायनीत श्री अप्पासाहेब गायकवाड श्री विलास लोंढे श्री प्रतीक गायकवाड श्री विश्वास सावंत श्री योगेश माने श्री राम मधाळे श्री प्रशांत उबाळे श्री मदन खंकाळ श्री वैभव गायकवाड श्री आप्पा तुपे श्री अमोल पाटोळे श्री विश्वनाथ जावळे श्री सत्यवान कमाने श्री अझर मनेर श्री धनाजीराव वाघमारे श्री दीपक चव्हाण सौ रेखा सकते सौ अर्चना बगाडे सौ सोनाली चव्हाण श्री संदीप माने श्री प्रकाश तोरणे श्री प्रवीण साळवे श्री अमर वाघमारे श्री रुपेश मिसाळ यांचा समावेश होता

