काँग्रेसचे राष्ट्रीय सचिव बी.एम. संदीप रविवारी साताऱ्यात
सातारा
अखिल भारतीय काँग्रेसचे सचिव आणि पश्चिम महाराष्ट्राचे प्रभारी बी.एम .संदीप येत्या रविवारी (दि. 12) सातारा दौऱ्यावर येत असल्याची माहिती जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष रणजीतसिंह श्री देशमुख यांनी दिली.
श्री देशमुख यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे, की श्री संदीप हे साताऱ्यात आल्यानंतर सकाळी साडेदहाला शाहूपुरी येथे सातारा शहर, तालुका आणि युवक काँग्रेसच्या वतीने आयोजित केलेल्या कार्यक्रमास उपस्थित राहतील. येथे ते ‘ मत चोर, गद्दी छोड ‘ या मोहिमेअंतर्गत स्वाक्षरी अभियानाला भेट देतील. यानंतर अकरा वाजता काँग्रेस भवनातील महात्मा गांधी सभागृहात जिल्ह्यातील सर्व तालुकाध्यक्ष आणि जिल्हा पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करून ते सांगलीकडे रवाना होतील.
दरम्यान,शाहूपुरी आणि काँग्रेस भवनात होणाऱ्या कार्यक्रमास काँग्रेसजनांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहनही श्री देशमुख यांनी या पत्रकाद्वारे केले आहे.

