ग्रंथमहोत्सव ही साताराची खरी ओळख :काका पाटील
सातारा
सातारा जिल्हा ग्रंथ महोत्सव समिती आयोजित सातारा येथे होणाऱ्या ९९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनानिमित्त ग्रंथमहोत्सव व मराठी साहित्य संमेलन होणार आहे.ग्रंथमहोत्सवाच्या वतीने विद्यार्थ्यांसाठी विविध स्पर्धा घेतल्या जातात. या स्पर्धांच्या निवड फेरीचे उद्घाटनचा कार्यक्रम सौ सुशिलादेवी साळुंखे हायस्कूल,सातारा या ठिकाणी संपन्न झाला.
सुशीला देवी साळुंखे हायस्कूलच्या मुख्याध्यापिका श्रीमती छाया कदम यांनी या स्पर्धांचे नेटके नियोजन केले होते. डॉ. बापूजी साळुंखे यांच्या प्रतिमेचे पूजन करून या कार्यक्रमाचे उद्घाटन झाले या उद्घाटन प्रसंगी माननीय काका पाटील हे उपस्थित होते.त्यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.ग्रंथमहोत्सव हा साताऱ्याची वाचन संस्कृती जोपासणारा उपक्रम असल्याचे प्रतिपादन करीत ग्रंथमहोत्सव साताऱ्याची खरी ओळख असल्याचे त्यांनी म्हंटले.
श्रीमती छाया कदम यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक करून सातारा जिल्हा ग्रंथ महोत्सव समितीचे अध्यक्ष प्राचार्य यशवंत पाटणे, कार्यवाह शिरीष चिटणीस, उपाध्यक्ष प्राचार्य वि.ना.लांडगे, समन्वयक सुनीता कदम, प्राचार्य प्रमोदिनी मंडपे, या सर्वांचे विद्यालयाच्या वतीने स्वागत केले.
प्राचार्य यशवंत पाटणे आणि शिरीष चिटणीस यांनीही स्पर्धक विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करून स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.
कथाकथन स्पर्धेचा निकाल
खुला गट
तनुजा धनंजय रानभरे (रामराव निकम बी एड कॉलेज इंदोली) प्रियंका गोपीनाथ मारकड (सौ.सुशीलादेवी साळुंखे हायस्कूल ज्युनिअर कॉलेज सातारा)
मोठा गट आठवी ते दहावी
श्राव्या मधुकर गायकवाड (आप्पासाहेब भाऊराव पाटील इंग्लिश मीडियम सातारा,) अखिलेश दत्तात्रय जाधव (अण्णासाहेब कल्याणी विद्यालय सातारा)
आद्या शिवराज धनवडे (अप्पासाहेब भाऊराव पाटील इंग्लिश मीडियम स्कूल सातारा) सोनम तानाजी लवटे (सौ.सुशीलादेवी साळुंखे हायस्कूल सातारा)
समृद्धी संदीप विभुते
(लोकमंगल हायस्कूल एमआयडीसी कोडोली)
लहान गट पाचवी ते सातवी
आलिया तनवीर भगवान (अनंत इंग्लिश स्कूल सातारा)
साई शंकर हंडाळ (गाडगे महाराज आश्रम शाळा ब्रह्मपुरी)
शर्वरी शैलेश माळी (जिल्हा परिषद शाळा कोडोली)
करुणा सत्यवान गायकवाड (सुशिलादेवी साळुंखे हायस्कूल सातारा)
प्रज्वल महादेव मदने (जिल्हा परिषद शाळा कोरटी)
वक्तृत्व स्पर्धा
खुला गट
मोनिका मारुती कुंभार (छत्रपती शिवाजी विद्यालय अपशिंगे)
मोठा गट आठवी ते दहावी
शांभवी सुशांत निंबाळकर (कमला निमकर बालभवन फलटण) अस्मिता वराडकर (सनशाईन) अल्पना वराडकर (सनशाईन)
संस्कृती कांबळे (लोकमंगल हायस्कूल एमआयडीसी)
दिव्यांगणा सचिन पंडित (श्रीमंत छत्रपती शिवाजी विद्यालय अपशिंगे)
देवेंद्र नितीन धवडे (कमला निमकर बालभवन फलटण)
समीक्षा बनकर (अण्णासाहेब कल्याणी सातारा)
छोटा गट पाचवी ते सातवी
विहान अमर मुळीक (आप्पासाहेब भाऊ साहेब पाटील इंग्लिश मीडियम स्कूल)
सानवी विक्रम मोरे (अण्णासाहेब कल्याणी हायस्कूल)
स्वराज्य रविंद्र सोनवणे (नगरपालिका शाळा नंबर 20) ईशान ललितकुमार जाधव (अनंत इंग्लिश मीडियम स्कूल)
परिणीती संदीप कदम (कमला निमकर बालभवन फलटण)
विराज मलिक नागटिळक (नगरपालिका शाळा नंबर 10) परिमला अभय पाटील (आप्पासाहेब भाऊसाहेब पाटील इंग्लिश मीडियम स्कूल)
स्वरांजली नामदेव यादव (लोकमंगल एमआयडीसी सातारा)
रुद्रांश सुरेश जगताप (अप्पासाहेब भाऊसाहेब पाटील इंग्लिश मीडियम स्कूल

