लेखिका डॉ उमा कुलकर्णी यांचा रविवारी सत्कार


प्रकट मुलाखतीचेही आयोजन

सातारा
येथील आम्ही पुस्तक प्रेमी समूह, दीपलक्ष्मी नागरी सहकारी पतसंस्था आणि महाराष्ट्र साहित्य परिषद शाखा शाहूपुरी यांच्या संयुक्त विद्यमाने ज्येष्ठ लेखिका, अनुवादक डॉ उमा कुलकर्णी यांच्या सत्काराचे आणि प्रकट मुलाखतीचे आयोजन करण्यात आले आहे

रविवार दिनांक 12 ऑक्टोबर रोजी सकाळी दहा वाजता हा कार्यक्रम सातारा नगर वाचनालयाच्या पाठक हॉलमध्ये होणार आहे

यावेळी संयोजकांतर्फे लेखिका डॉ उमा कुलकर्णी यांचा अमृत महोत्सवी सत्कार करण्यात येणार असून मानपत्र प्रदान करण्यात येणार आहे
डॉक्टर संदीप श्रोत्री आणि विनोद कुलकर्णी डॉ उमा कुलकर्णी यांची प्रकट मुलाखत घेणार आहेत

Advertisement

डॉ उमा कुलकर्णी यांनी स्वर्गीय भैरप्पा, शिवराम कारंथ आणि अनेक कन्नड लेखकांची पुस्तके मराठीमध्ये अनुवादित केली असून त्यापैकी कित्येक पुस्तकांना अनेक पुरस्कार प्राप्त झाले आहेत. साहित्य अकादमीचा अनुवादित पुस्तकांच्या विभागात पहिलाच पुरस्कार त्यांना मिळाला होता.

कार्यक्रमाचा लाभ साहित्य रसिकांनी घ्यावा असे आवाहन डॉक्टर संदीप श्रोत्री, शिरीष चिटणीस,विनोद कुलकर्णी आणि नंदकुमार सावंत यांनी केले आहे


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!