चंद्रगीतांच्या मैफिलीला प्रतिसाद


मानसी सदामते यांचा विशेष सत्कार
सातारा

Advertisement

दीपलक्ष्मी नागरी सहकारी पतसंस्था आणि माय बिट्स स्टुडिओ यांचे संयुक्त विद्यमाने कोजागिरी निमित्त चंद्रावर आधारित विविध मराठी हिंदी गीतांची चंद्र आहे साक्षीला ही मैफिल सादर झाली. डॉ लियाकत शेख यांनी गायलेल्या चांद आहे भरेगा या गीताने हा प्रवास सुरू झाला..मंजिरी दीक्षित वनिता कुंभार
अल्ताफ मुल्ला, जलील शेख, आशुतोष देशपांडे, गणेश शिंदे, धीरेन राजपुरोहित, सीमा रजपुत , चित्रा भिसे यांनी विविध गाणी सादर केली
या कार्यक्रमात शिरीष चिटणीस यांनीही दोन गीते सादर केली
कार्यक्रमाचे अभ्यासपूर्ण ओघवते निवेदन चित्रा भिसे यांनी केले .
प्रारंभी प्रास्ताविकात शिरीष चिटणीस यांनी माय बिट्स च्या उपक्रमांचे कौतुक केले. दीपलक्ष्मी मध्ये कराओके बरोबर आता शास्त्रीय मैफिलीही होतात याबद्दल माहिती दिली.
मुकुंद फडके यांनी चंद्र सर्वांचा एकच आहे.संकष्टीला आणि ईदला तो एकच असतो आपण त्याची विभागणी करतो असे मार्मिक भाष्य केले.ऊर्जा देणारा सूर्य आणि शीललता देणारा चंद्र हे खरे देव आहेत हे देव आपल्याला रोज दर्शन देत असतात पण आपण उगाच कर्मकांडाच्या मागे लागतो आणि बाबा बुवा महाराज याना देव करतो असेही ते म्हणाले
सुरेखा शेजवळ यांनी कोजागिरीची पार्शभूमी सांगितली. डॉ सुहास पाटील यांनी चंद्रावर असणाऱ्या गाण्यांची वैशिष्ट्ये कथित केली
यावेळी मानसी प्रकाश सदामते हिचा विशेष सत्कार डॉ लियाकत शेख यांच्या हस्ते करणे त आला. आपली गिर्यारोहणची आवड जपणारी, कथ्थक नृत्य विशारद आणि नृत्य प्रशिक्षक मानसी सदामते डाकवे हिचा सन्मान सन्मानचिन्ह देऊन करण्यात आला. यावेळी तिची आई मंजिरी सदामते.. सासू सासरे श्री व सौ डाकवे उपस्थित होते.
कार्यक्रमानंतर रसिकांसाठी दुग्ध पान आयोजन केले होते. उपस्थितांचे आभार डॉ लियाकत शेख यांनी मानले.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!