वास्तुशास्त्र आणि मेदिनीय ज्योतिषावर व्याख्यान
सातारा ज्योतिष मंडळातर्फे ५ ऑकटोबर रोजी आयोजन
सातारा
सातारा ज्योतिष मंडळातर्फे रविवार दिनांक ५ ऑकटोबर रोजी वास्तुशास्त्र आणि मेदिनीय ज्योतिषावर व्याख्यान आयोजित करण्यात आले आहे. महिला मंडळ हॉल, राजवाडा बसस्टॉप जवळ, मारुती मंदिरासमोर येथे हे व्याख्यान दुपारी चार वाजता होणार आहे
आपल्या घरात सुख शांती नांदावी असे सर्वांनाच वाटते. म्हणूनच वास्तुशास्त्राप्रमाणे आपले घर असावे असेही वाटत असते. वास्तुशास्त्र नेमके आहे काय हे समजून घेण्यासाठी आणि कोणत्या साध्यासुध्या उपायांनी आपल्या घरात सुख शांती नांदू शकते हे समजण्यासाठी पुणे येथील सुप्रसिद्ध ज्योतिषतज्ञ सुहास डोंगरे यांचे वास्तुशास्त्र या विषयावर व्याख्यान होणार आहे पुणे येथील सुप्रसिद्ध मेदिनीय ज्योतिष तज्ञ सिद्धेश्वर मारटकर यांचे राष्ट्राचे भविष्य कसे सांगितले जाते त्याचप्रमाणे येणाऱ्या काळात आपल्या देशात काय काय घडामोडी घडू शकणार आहेत या विषयावर व्याख्यान ऐकायला मिळणार आहे. या व्याख्यान साठी बहुसंख्येने उपस्थित राहावे असे आवाहन ज्योतिष मंडळ साताराचे अध्यक्ष प्राचार्य रमणलाल शहा आणि पदाधिकारी यांनी केलेले आहे.अधिक माहिती करिता श्री महेश कुलकर्णी 9822397394 यांच्याशी संपर्क साधावा

