माय बिट्स स्टुडिओतर्फे धैर्या कुलकर्णीचा सत्कार


दीपलक्ष्मी सभागृहात विशेष सन्मान
सातारा
साताऱ्यातील माय बिट्स स्टुडिओच्या वतीने. साताऱ्याची शिखरकन्या कु धैर्या विनोद कुलकर्णी हिचा दक्षिण आफ्रिकेतील सर्वात उंच शिखर किलीमांजारो सर केल्याबद्दल सन्मान करण्यात आला .
दीपलक्ष्मी नागरी पतसंस्था आणि माय बिट्स स्टुडिओ सातारा यांच्यावतीने स्वर्गीय मुकेश यांच्या निवडक गीतांचा कार्यक्रम सपनोंका सौदागर सादर झाला.त्यावेळी हा सत्कार सोहळा झाला. दीपलक्ष्मी नागरी पत्तसंस्था चेअरमन शिरीष चिटणीस आणि डॉ लियाकत शेख यांच्या हस्ते हा सत्कार झाला.
धैर्या ही शिखर कन्या आहेच पण गिर्यारोहणा सोबत गायन , वादन, चित्रकला, वाचन,वक्तृत्व अशा विविध माध्यमात रस असणारी आहे आणि या सर्व क्षेत्रात प्राविण्य मिळवले आहे अशी माहिती निवेदिका चित्रा भिसे यांनी दिली.
शिरीष चिटणीस म्हणाले, धैर्याची वाचनाची आवड आणि भाषण कला स्पृहणीय आहे.पुणे येथील एका सत्कार सोहळ्यात तिचे भाषण सर्वात उत्तम झाले. तिच्या अंगी जिद्द आहे त्यामुळे ठरवलेले ध्येय ती लीलया गाठते.नम्रता हा अभावानेच आढळणारा गुण तिच्यात आहे.
मुकुंद फडके म्हणाले,एकाच व्यक्तीच्या अंगात किती गुण असावेत याचे उत्तम उदाहरण म्हणजे धैर्या आहे.असा अष्टपैलूपणा अभावानेच आढळतो. धैर्याने हा अष्टपैलूपणा जपला आहे आणि विकसित केला आहे.
या सत्काराला उत्तर देताना धैर्या म्हणाली, हे मी केवळ आई व बाबांच्या पाठिब्यामुळेच करू शकले. मी लहानपणापासून साताऱ्यातील सर्व गड किल्ले पालथे घातले.नंतर विनोद कुलकर्णी अर्थात बाबांनी एव्हरेस्ट बेस कँपचे स्वप्न दाखविले मग मी थांबले नाही आणि ते स्वप्न पूर्ण केले.
कार्यक्रमास प्रमुख पाहुणे ज्येष्ठ पत्रकार मुकुंद फडके , कलाप्रेमी विजय जंगम , सुहास पाटील आणि दीपलक्ष्मी नागरी पतसंस्थेचे शिरीष चिटणीस, माय बिट्स स्टुडिओचे डॉ लियाकत शेख, इतर सदस्य वनिता कुंभार, मंजिरी दीक्षित, चित्रा भिसे, अल्ताफ शेख, गणेश शिंदे, जलील शेख आणि इतर सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!