मुकेश यांच्यामुळे भारतीय संगीत परदेशात लोकप्रिय
माय बिट्स स्टुडिओच्या कार्यक्रमात मुकुंद फडके यांचे प्रतिपादन
सातारा
थोर गायक मुकेश यांच्यामुळे भारतीय संगीत परदेशात लोकप्रिय झाले. मुकेश यांनी म्हटलेली अनेक गाणी आजही रशिया आणि इतर देशात लोकप्रिय आहेत असे प्रतिपादन ज्येष्ठ पत्रकार मुकुंद फडके यांनी केले
दीपलक्ष्मी नागरी पत्तसंस्था आणि माय बिट्स स्टुडिओ सातारा यांच्यावतीने मखमली गळ्याचे गायक स्वर्गीय मुकेश यांच्या निवडक गीतांचा कार्यक्रम सपनोंका सौदागर सादर झाला.त्यावेळी ते बोलत होते
राज कपूरचा आवाज अशी ओळख झालेल्या मुकेश यांची मेरा जुता है जपानी किंवा आवारा हू अशी अनेक गाणी परदेशात लोकप्रिय आहेत मुकेश यांनी परदेशात अनेक स्टेज शो केले तेव्हा त्यांना ही गाणी म्हणण्याचा आग्रह केला जायचा असे मुकुंद फडके म्हणाले
या कार्यक्रमात मुकेश यांच्या सदाबहार गीतांसोबत त्यांचा जीवनप्रवास आणि त्यांच्या व्यक्तिमत्त्वातील वैशिठ्यासह गायकी ची वैशिष्ट्ये उलगडत गेली
प्रारंभी दीपलक्ष्मी नागरी पतसंस्थेचे संस्थापक अध्यक्ष शिरीष चिटणीस यांनी प्रास्ताविक केले.अशा वैविध्यपूर्ण कार्यक्रमामुळे सातारा सांस्कृतिक दृष्ट्या अधिक समृद्ध होतोय याचा आयोजक म्हणून अभिमान वाटतो असे त्यांनी नमूद केले.
यावेळी प्रमुख पाहुणे विजय जंगम यांनी व सुहास पाटील यांची ही विशेष उपस्थिती लाभली.
मुकेश यांच्या कही दूर जब दीन ढल जाए या गीताने डॉ लियाकत शेख सरानी सुरुवात केली.. त्यानंतर सजन रे झूठ मत बोलो, दिल की नजर से, मै ना भुलुंगा, सुहानी चांदनी राते,जिना इसीका नाम है , दोस्त दोस्त ना रहा.. एक प्यार का नगमा है,कभी कभी …अशा किती तरी सोलो, यूगल गीतांनी आणि सोबत किस्से आठवणी नि रसिक मंत्रमुग्ध झाले.. मेरा नाम जोकर मधील जीना यहा मरना यहा या गीताने मैफिलीची सांगता झाली .
कार्यक्रमात माय बिट्स स्टुडिओ चे डॉ लियाकत शेख यांचे समवेत मंजिरी दीक्षित, वनिता कुंभार, सीमा राजपूत, चित्रा भिसे, अल्ताफ शेख, जलील शेख, गणेश शिंदे या गायकांनी दमदार साथ दिली. मुकेश यांचा जीवनपट आपल्या अभ्यासपूर्ण निवेदनातून चित्रा भिसे यांनी उलगडला.
कार्यक्रमास साताऱ्यातील असंख्य संगीत प्रेमींनी हजेरी लावली होती. डॉ लियाकत शेख यांनी आभार मानले आणि मुकेश यांच्या सदाबहार गीतांच्या स्मृती जागवत रसिकांचा निरोप घेतला

