गुरुवारी साताऱ्यात गाणी मनातली कार्यक्रम
दीपलक्ष्मी पतसंस्था व सरगमतर्फे आयोजन
सातारा
येथील दीपलक्ष्मी नागरी सहकारी पतसंस्था व सरगम ग्रुपतर्फे गुरुवार दिनांक 18 सप्टेंबर रोजी सायंकाळी साडेपाच वाजता दीपलक्ष्मी सांस्कृतिक सभागृह येथे गाणी मनातील हा विशेष कार्यक्रम सादर करण्यात येणार आहे.
या कार्यक्रमात बहारदार हिंदी-मराठी गाणी सादर केली जाणार असून कार्यक्रमाला शिरीष चिटणीस, डॉ कामिनी पाटील,सुरेखा शेजवळ आणि मुकुंद फडके प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत.
या कार्यक्रमामध्ये हेमंत शिंदे, संजय गोडसे, सचिन माने, लक्ष्मण खामकर, सतीश पाटील, मेघा पंडित, संगीता पोतेकर, गजानन नलवडे गाणी सादर करणार आहेत कार्यक्रमाचे निवेदन सचिन माने करणार आहेत.या कार्यक्रमाचा लाभ सर्वांनी घ्यावा असे आवाहन दीपलक्ष्मी पतसंस्थेचे चेअरमन शिरिष चिटणीस आणि सरगम ग्रुपचे हेमंत शिंदे संजय गोडसे यांनी केले आहे.

