ज्वेल्स ऑफ रफी कार्यक्रमाला प्रतिसाद


दीपलक्ष्मी पतसंस्था आणि हार्मनी ग्रुप यांच्यातर्फे आयोजन

Advertisement

सातारा
येथील दीपलक्ष्मी नागरी सहकारी पतसंस्था आणि हार्मनी ग्रुप यांच्यातर्फे गाने जो दिल को छू ले या मालिकेअंतर्गत भाग ७४ वा ज्वेल्स ऑफ रफी या नावाने सादर करण्यात आला या कार्यक्रमाला रसिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला भारतीय चित्रपटसृष्टीतील तानसेन अशी ओळख असलेले जेष्ठ गायक मोहम्मद रफी यांचा स्मृतिदिन नुकताच झाला. त्यानिमित्ताने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते मोहम्मद रफी यांनी जी हजारो गाणी गायली त्यातली काही महत्त्वाची निवडक गाणी यावेळी रवींद्र खांडेकर, गीतांजली पाटील, संगीता हेंद्रे, धनश्री बागडे, रागिणी शिकलगार ममता नरहरी यांनी सादर केली या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून रवींद्र खांडेकर, लियाकत शेख,मुकुंद फडके आणि शिरीष चिटणीस उपस्थित होते
यावेळी शिरीष चिटणीस यांनी कार्यक्रमामागील संकल्पना स्पष्ट केली
मुकुंद फडके यांनी मोहम्मद रफी यांनी गायलेल्या मराठी गाण्यांची माहिती देऊन ज्येष्ठ संगीतकार श्रीकांत ठाकरे आणि मोहम्मद रफी यांच्यातील मधुर संबंधांना उजाळा दिला


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!