फुले शाहू–आंबेडकर यांच्या विचारांनी समतेचा दीप उजळला


कर्मवीर भाऊराव पाटील इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंटमध्ये प्रा.निरंजन फरांदे यांचे व्याख्यान
सातारा
फुले शाहू–आंबेडकर यांच्या विचारांनी समतेचा दीप उजळला असे मत प्रा. निरंजन फरांदे यांनी व्यक्त केले रयत शिक्षण संस्थेच्या कर्मवीर भाऊराव पाटील इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट, सातारा येथे शनिवार दिनांक ११ एप्रिल २०२६ रोजी “सामाजिक समता, बंधूता व जनजागृती सप्ताह निमित्त प्रा. निरंजन फरांदे यांचे व्याख्यान आयोजीत करण्यात आले होते.
महात्मा ज्योतिराव फुले आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त दि. ८/४/२०२६ ते १४/४/२०२६ या कालावधीत सामाजिक समता,बंधूता जनजागृती सप्ताह आयोजित केलेला आहे. समाजातील समता, शिक्षण आणि सामाजिक न्याय यांविषयी विद्यार्थ्यांमध्ये जागृती निर्माण करणे हा या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश होता.
या प्रसंगी प्रमुख वक्ते म्हणून प्रा. निरंजन फऱांदे यांनी समकालीन धर्माचा अतिरेक व बहुजन समाजावर अन्याय व मनुसंस्कृतीमुळे समाज अशिक्षीत राहण्यासाठी बहूजनांना शिक्षणाचा अधिकार व सतीच्या चालीविषयी मार्गदर्शन केले. आपल्या भाषणात त्यांनी मुलींच्या शिक्षणाचा इतिहास उलगडून सांगितला तसेच शिक्षणासाठी महात्मा फुले यांनी केलेल्या कार्याचा विशेष उल्लेख केला. तसेच कर्मवीर भाऊराव पाटील (अण्णा) यांच्या शिक्षण प्रसारातील महान कार्यावरही त्यांनी प्रकाश टाकला.
त्यांनी पुढे समाजातील पूर्वीच्या स्पृश्य आणि अस्पृश्य या भेदभावपूर्ण प्रथांबद्दल माहिती देत सामाजिक समतेचे महत्त्व अधोरेखित केले. तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या सामाजिक न्यायासाठीच्या योगदानाचे महत्त्व स्पष्ट केले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी इन्स्टिट्यूटचे संचालक डॉ. बी. एस. सावंत होते. आपल्या अध्यक्षीय भाषणात त्यांनी महात्मा ज्योतिराव फुले यांच्या कार्यकाळाचा आढावा घेत त्यांच्या सामाजिक सुधारणा व कायद्यांबाबत माहिती दिली आणि समतेच्या विचारांची गरज अधोरेखित केली.
कार्यक्रमाचे समन्वयक म्हणून सौ. संध्या जायकर यांनी कार्यक्रमाची प्रस्तावना केली.
या कार्यक्रमास प्राध्यापकवर्ग व विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला व कार्यक्रम यशस्वीरीत्या पार पडला


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!