शुक्रवारी साहित्यिक डॉक्टर राजेंद्र माने यांच्याशी संवाद
दीपलक्ष्मी पतसंस्था व आम्ही पुस्तकप्रेमी समूहातर्फे आयोजन
सातारा
येथील दीपलक्ष्मी नागरी सहकारी पतसंस्था व आम्ही पुस्तक प्रेमी समूह यांच्या संयुक्त विद्यमाने ज्येष्ठ लेखक डॉक्टर राजेंद्र माने यांच्याशी लेखक तुमच्या भेटीला उपक्रमांतर्गत संवाद साधण्यात येणार आहे. शुक्रवार दिनांक 22 ऑगस्ट रोजी सायंकाळी पाच वाजता दीपलक्ष्मी सांस्कृतिक सभागृहामध्ये हा कार्यक्रम होणार असून यावेळी डॉक्टर संदीप श्रोत्री आणि शिल्पा चिटणीस डॉक्टर राजेंद्र माने यांच्याशी संवाद साधणार आहेत या कार्यक्रमाच्या समन्वयक स्वाती राऊत आहेत
सर्व साहित्यप्रेमींनी या कार्यक्रमाला उपस्थित राहावे असे आवाहन दीपलक्ष्मी नागरी सहकारी पतसंस्थेचे चेअरमन आणि महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कार्यवाह शिरीष चिटणीस अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे कोषाध्यक्ष विनोद कुलकर्णी , आम्ही पुस्तक प्रेमी समूहाचे समन्वयक श्रीराम नानल आणि प्रसिद्धीप्रमुख मुकुंद फडके यांनी केले आहे

