केबीपी मॅनेजमेंटमध्ये मार्गदर्शन कक्ष सुरू
ऑनलाईन सीईटी प्रवेश प्रक्रिया
सातारा
महाराष्ट्र राज्य सामयिक प्रवेश परीक्षा कक्षाच्या वतीने शैक्षणिक वर्ष २०२६-२७ साठी एमबीए सीईटी २०२६ चे अधिकृत वेळापत्रक शासनाने जाहीर केले असून ऑनलाईन फॉर्म भरण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. एमबीए, बीबीए आणि बीसीए पदवी प्रवेशासाठीच्या सीईटीसंदर्भांत पदवीच्या अंतीम वर्गात व बारावीत शिकत असलेल्या विद्यार्थ्यांना व पालकांना योग्य माहिती व फॉर्म भरण्यासाठी वर्ये येथील कर्मवीर भाऊराव पाटील मॅनेजमेंट इन्स्टिट्यूट मध्ये प्रवेश प्रक्रिया मार्गदर्शन कक्ष सुरू करण्यात आला आहे.
सदर सीईटी प्रवेश दिलेल्या विद्यार्थ्यांना प्रवेश मिळतो व शासनाच्या सर्व शिष्यवृत्ती मिळण्यास पात्र होतात आणि प्रवेश परिक्षेसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया सुरु झाली म्हणून अर्ज करण्याची अंतिम तारीख १२ फेब्रुवारी २०२६ अंतीम मुदत दिली आहे. तरी इच्छूक विद्यार्थी-विद्यार्थिनींनी www.mahacet.org या वेबसाईटवर जाऊन माहिती घ्यावी. यावर्षीची एमबीए प्रवेशसाठीची ऑनलाईन सीईटी परिक्षा ६ ते ८ एप्रिल आणि ९ मे २०२६ रोजी होणार आहे.
विद्यार्थ्यांनी प्रवेश परिक्षा ऑनलाईन फॉर्म भरण्याची मोफत सोय इन्स्टिट्यूट प्रवेश कक्षात करण्यात आली आहे. तरी विद्यार्थ्यांनी संधीचा फायदा घ्यावा असे आवाहन इन्स्टिट्युटचे संचालक डॉ बी एस सावंत यांनी केले आहे

