मधुसूर स्पर्धेत आराध्या घरसे, शुभ्रा खाडे प्रथम
मधुसूर राज्यस्तरीय आंतरशालेय सुगम संगीत स्पर्धा २०२५
सातारा
स्व. नानासाहेब द्रविड स्मरणार्थ मधुसूर राज्यस्तरीय आंतरशालेय सुगम संगीत स्पर्धा २०२५ रविवार दिनांक १७ ऑगस्ट रोजी शाहू कला मंदिरात उत्साहात संपन्न झाली. स्पर्धेचे उद्घाटन डॉ. उदय टेकाळे, मा. आयुक्त, जळगाव महानगरपालिका आणि डॉ. रंजना पाटील, प्राचार्या, पी.डी. इ. ए. विधी महाविद्यालय, हडपसर, श्री. अरविंद दामले, उपमुख्याधिकारी, सातारा नगरपरिषद यांचे शुभहस्ते झाले. उद्घाटनासमयी स्पर्धेचे आयोजक ॲड. अमित द्रविड यांनी प्रास्ताविक केले तर निवेदनाची धुरा सौ. स्वप्नजा बर्वे यांनी सांभाळली. महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यातून तब्बल ७५ स्पर्धकांनी सहभाग घेतला होता. बक्षीस समारंभ ज्येष्ठ रंगकर्मी तुषार भद्रे आणि सुप्रसिद्ध संगीतकार देवदत्त मनिषा बाजी यांचे उपस्थितीत संपन्न झाला. या वर्षीपासून ‘ लोकप्रिय आवाज ‘ नावाने दोन्ही गटांसाठी एक नवीन पुरस्कार जाहीर करण्यात आला ज्यामध्ये उपस्थित लोकांनी मतदान करून आपला आवडता स्पर्धक निवडला. स्पर्धकांना सुरेल साथ दौलत खंडझोडे, वैभव साने आणि शांताराम दयाळ यांनी केली. स्पर्धेसाठी परीक्षक म्हणून बाळासाहेब चव्हाण, राजेंद्रकुमार भोसले आणि अजित सहस्त्रबुद्धे यांनी काम पाहिले. स्पर्धेकरिता प्रशांत कुलकर्णी, ॲड स्नेहल कुलकर्णी, संकेत पुराणिक, स्वानंदी पुराणिक, मकरंद वझे, स्वाती वझे, गणेश धावडे, ॲड निलेश देशपांडे, ॲड प्रणव टोणपे, मृणालिनी वझे, जयंत सहस्रबुद्धे, मीना सुपनेकर, राजगोपाल द्रविड, हेमा द्रविड आदींनी परिश्रम घेतले.
स्पर्धेचा निकाल पुढीलप्रमाणे :
बाल गट :
प्रथम क्रमांक : कु. आराध्या सोमनाथ घरसे, डॉ. सायरस पूनावाला इंटरनॅशनल स्कूल, पेठ वडगाव ( सातवी )
द्वितीय क्रमांक : कु. कौण्डिण्य विशाल कांबळे, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, देशमुखनगर ( सहावी )
तृतीय क्रमांक : कु. तनया निकित सर्वटे, पोदार इंटरनॅशनल स्कूल, सातारा ( पाचवी )
उत्तेजनार्थ प्रथम : कु. श्रीजीत उदयसिंह राजेकदम, अनंत इंग्लिश स्कूल, सातारा ( सहावी )
उत्तेजनार्थ द्वितीय : कु. अनन्या संदीप होंकण, कलमाडी शामराव हायस्कूल, पुणे ( सहावी )
उत्तेजनार्थ तृतीय : कु. आराध्या विनायक भंडारे, ज्ञानसंवर्धिनी इंग्लिश मिडीयम स्कूल, शिरवळ (सातवी)
कुमार गट :
प्रथम क्रमांक : कु. शुभ्रा सचिन खाडे, प्रायव्हेट हायस्कूल, कोल्हापूर ( आठवी )
द्वितीय क्रमांक : कु. संस्कृती जितेंद्र आवळे, रणजित कौर गडोख खालसा महाराष्ट्र विद्यालय, अतित ( नववी )
तृतीय क्रमांक : कु. वैष्णवी संजीवकुमार आरेकर, अनंत इंग्लिश स्कूल, सातारा ( नववी )
उत्तेजनार्थ प्रथम : कु. अपूर्वा विनायक जावळे, तात्यासाहेब मुसळे विद्यालय, इचलकरंजी ( आठवी )
उत्तेजनार्थ द्वितीय : कु. संस्कृती सचिन अभंग, न्यू इंग्लिश स्कूल, हुमगाव ( आठवी )
उत्तेजनार्थ तृतीय : कु. अक्षरा रमेश गिरी, सरस्वती विद्यालय कोरेगाव ( नववी )
मधुसूर लोकप्रिय आवाज पुरस्कार :
बाल गट : कु. अनन्या संदीप होंकण, कलमाडी शामराव हायस्कूल, पुणे ( सहावी )
कुमार गट : कु. अपूर्वा विनायक जावळे, तात्यासाहेब मुसळे विद्यालय, इचलकरंजी ( आठवी )

