काटेवाडीत गोल्डन मिठाईची चर्चा
कार्यकर्त्याने अजितदादांसाठी आणली चक्क सोन्याची मिठाई
बारामती
बारामतीमध्ये पाडव्याचा सण जोरदार साजरा करण्यात आला 50 वर्षांमध्ये पहिल्यांदाच पवार कुटुंबात दोन दिवाळी पाडव्याचे सण साजरे झाले
शरद पवार यांचा गोविंदबाग या ठिकाणी तर अजित पवार यांनी पहिल्यांदाच काठेवाडी येथे दिवाळी पाडव्याचे आयोजन केले यावेळी अजित पवारांना भेटण्यासाठी आलेल्या कार्यकर्त्यांने दादांचं तोंड गोड करण्यासाठी सोन्याची मिठाई आणली
अजित पवारांसाठी आणलेल्या या सोन्याच्या मिठाईची जोरदार चर्चा सुरू आहे, अजित पवारांसाठी ही मिठाई बनवण्यात आली आहे. सोन्यासारख्या माणसाला सोन्याची मिठाई आणली आहे. यामध्ये ९९ टक्के सोन्याचा अर्क आहे, अजित पवारांसाठी ही मिठाई चितळे बंधु यांच्याकडून तयारी करण्यात आली आहे’, अशी माहिती यावेळी या कार्यकर्त्यांने दिली आहे.आबा काळे असे या कार्यकर्त्याचे नाव आहे

