मधुसूर आंतरशालेय सुगम संगीत स्पर्धा रविवारी


सातारा
सामाजिक शैक्षणिक क्षेत्रात मोलाचे योगदान देणारे समाजभूषण स्वर्गीय काशिनाथ गणेश उर्फ नानासाहेब द्रविड यांच्या स्मरणार्थ त्यांचे नातू ऍड अमित द्रविड यांनी राज्यस्तरीय मधुसूर आंतरशालेय सुगम संगीत स्पर्धा २०२५ आयोजित केली आहे युवा पिढीला भारतीय संगीत क्षेत्रात नवीन व्यासपीठ उपलब्ध करून देण्याचा हा प्रयत्न आहे रविवार दिनांक १७ ऑगस्ट रोजी सकाळी नऊ वाजता शाहू कला मंदिर येथे ही स्पर्धा होणार आहे या स्पर्धेचे उदघाटन रविवारी सकाळी ९ वाजता राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले ,जळगाव महापालिकेचे आयुक्त डॉ उदय टेकाळे ,हडपसर येथील विधी महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ रंजना पाटील यांच्या हस्ते होणार आहे यावेळी सातारा नगरपालिकेचे मुख्याधिकारी अभिजित बापट आणि उपमुख्याधिकारी अरविंद दामले यांची उपस्थिती असणार आहे स्पर्धेचा बक्षीस समारंभ ज्येष्ठ रंगकर्मी तुषार भद्रे आणि संगीतकार देवदत्त बाजी यांच्या हस्ते होणार आहे
या कार्यक्रमाला सर्वानी उपस्थित राहावे असे आवाहन स्पर्धेचे संयोजक ऍड अमित द्रविड यांनी केले आहे


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!