जरांगेंना मराठा नेत्याकडून ८ दिवसाचा ‘अल्टिमेटम


डिजिटल फलक लावत मनोज विचारले अनेक प्रश्न

Advertisement

सोलापूर
सोलापूर जिल्ह्यातील बार्शी तालुक्यात मराठा समाज बांधवाने डिजिटल फलक लावत मनोज जरांगे पाटील यांना प्रश्न विचारले आहे.आगामी विधानसभा निवडणुकीत मराठा समाजाने काय भूमिका घ्यावी.महायुतीला पाठिंबा द्यावयाचा कि महाविकास आघाडीला पाठिंबा द्यावयाचा? यावरून मराठा समाज विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने संभ्रमात पडला आहे. लोकसभा निवडणुकीत जरांगे पाटील यांनी सांगितल्या प्रमाणे महाविकास आघाडीला पाठिंबा दिला होता.मात्र महाविकास आघाडीकडून लोकसभा निवडणुकीनंतर मराठा आरक्षणाबाबत जाहिरपणे किंवा ठोस आश्वासन मिळाले नाही. जरांगे पाटील यांना प्रश्न विचारत बार्शी मधील अण्णासाहेब शिंदें या मराठा नेत्याने डिजिटल फलक लावले आहे.जरांगे पाटील यांनी खुलासा नाही केला तर,बार्शी मधील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यासमोर ठिय्या आंदोलन करणार असल्याचा इशारा दिला आहे.
बार्शी तालुक्यातील मराठा नेते अण्णासाहेब शिंदे यांनी मनोज जरांगे पाटील यांच्याविरोधात उपोषणाला बसण्याचा इशारा दिला आहे. महाविकास आघाडीच्या नेत्यांना त्यांच्या जाहीरनाम्यात मराठ्यांना ओबीसीमधून आरक्षण देण्याबाबत आश्वासन देण्यासाठी सांगणार का? असा सवाल अण्णासाहेब शिंदे यांनी उपस्थित केला आहे. अण्णासाहेब शिंदें इतरही प्रश्न उपस्थित केले आहेत.मनोज जरांगे पाटील यांनी आठ दिवसात याचे उत्तर न दिल्यास मनोज जरांगे पाटील यांच्याविरोधात उपोषण करणार असल्याचा इशारा बार्शी मधील अण्णासाहेब शिंदें या मराठा नेत्याने दिला आहे.
अण्णासाहेब शिंदे म्हणाले, महाविकास आघाडी सत्तेत आल्यानंतर किती दिवसात मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण देणार हे त्यांच्याकडून लिहून घ्या. मनोज दादा यापूर्वी मराठा-मुस्लिम वाद, मराठा-दलित वाद आणि आता मराठा ओबीसी वाद सुरू आहे. त्यामुळे आणखी किती जातींशी वैमनस्य घ्यायचे ते सांगा. देवेंद्र फडणवीस यांना हटवताना मराठा असलेले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील सरकार पाडून आपण ब्राह्मण असलेल्या उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्रीपदी बसवून मराठा समाजावर अन्याय करणार नाही का? असे प्रश्न अण्णासाहेब शिंदें यांनी उपस्थित केले आहेत.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!