‘ओंजळीतील शब्दफुले ‘कवितांची मैफल
नगर वाचनालयाच्या वर्धापन दिनानिमित्त विशेष कार्यक्रम
Advertisement
सातारा
येथील श्रीमंत छत्रपती प्रतापसिंह महाराज (थोरले) नगर वाचनालयाचा 171 व्या वर्धापन दिन आणि त्याच दिवशी येत असलेल्या महाकवी कालिदास दिनानिमित्त शब्दांकुर, मुंबई निर्मित ओंजळीतील शब्दफुले या काव्यमय मैफलीचे आयोजन करण्यात आले आहे.
शनिवार, दि. ६ जुलै २०२४ रोजी सायंकाळी ६ वाजता वाचनालयाच्या पाठक सभागृहात ओंजळीतील शब्दफुले या कार्यक्रमात विजय जोशी (डोंबिवली), मानसी चापेकर (रोहा-रायगड) आणि चैत्राली जोगळेकर (पवई-मुंबई) आपल्या स्वरचित कविता सादर करणार आहेत. हा त्यांचा ६५ वा कार्यक्रम असून मुंबईबाहेरचा पहिलाच कार्यक्रम आहे.
तरी साहित्यप्रेमींनी या काव्यमय मैफिलीचा आनंद लुटावा, असे आवाहन वाचनालयाचे अध्यक्ष अजित कुबेर यांनी केले आहे.
