साहित्य मुल्यवर्धनाचे कार्य करते:विजयराव जोशी
महाराष्ट्र साहित्य परिषद शाहूपुरी शाखेस पुरस्कार
सातारा
साहित्य संमेलने मोठ्या प्रमाणात होतात. मात्र सामान्य लोकांना त्याचा कोणत्या प्रकारे लाभ होऊ शकतो याचा आढावा नगर वाचनालय महाराष्ट्र साहित्य परिषद अशा संस्थांनी घेणे आवश्यक आहे . स्वांत सुखाय्य ते जनसुखाह्य असा साहित्याचा प्रवास असतो .या प्रवासात साहित्य मूल्यवर्धनाचे काम नेहमीच करत असते,असे प्रतिपादन विजयराव जोशी यांनी केले
श्रीमंत छत्रपती प्रतापसिंह महाराज थोरले नगर वाचनालयातर्फे कै. जयश्री यशवंत कारखानीस यांचे स्मृत्यर्थ असणाऱ्या कर्तृत्व गौरव पुरस्काराचे वितरण करण्यात आले.हा पुरस्कार महाराष्ट्र साहित्य परिषद पुणे शाखा शाहूपुरी या संस्थेस तिच्या साहित्यातील योगदानासाठी श्री विजयराव जोशी यांचे शुभहस्ते प्रदान करण्यात आला.त्यावेळी ते बोलत होते
संस्थेच्या वतीने संस्थापक अध्यक्ष विनोद कुलकर्णी व अध्यक्ष नंदकुमार सावंत यांनी तो स्वीकारला.
यावेळी बोलताना श्री विजयराव जोशी म्हणाले,रामायण महाभारत ही महाकाव्ये काळाच्या कसोटीवर टिकली ती त्यातील मूल्यांमुळेच. आज सांस्कृतिक आक्रमणाच्या काळात साहित्य माणसाला जगवू शकते, त्याच्यात मूल्ये रुजवू शकते. साहित्य व्यवहारात असणाऱ्या मसाप, नगरवाचनालय अशा संस्थांनी समाजमने घडविण्यासाठी अधिकाधिक प्रयत्न करणे आवश्यक आहे..यावेळी त्यांनी पौराणिक काळापासूनच्या वेदव्यासांच्या साहित्यापासून ते आजच्या देवबाभळी नाटकापर्यंतच्या साहित्य कृतींचा आढावा घेतला.
विनोद कुलकर्णी यांनी स्थापनेपासून ते आत्तापर्यंत असा व शाहूपुरी शाखेने केलेल्या कार्याचा आढावा घेतला आणि पदत्याग केल्यानंतरही ही शाखा उत्तमपणे कार्य करत राहणार आहेत हे आता विश्वास दर्शवला
नंदकुमार सावंत म्हणाले या शाखेचे अध्यक्ष म्हणून काम करताना एक जबाबदारी म्हणून मी या सर्वाकडे पाहतो त्यातही नियोजित साहित्य संमेलन हे सातारचे साहित्य संमेलन म्हणून चांगल्या पद्धतीने व्हावे याचा प्रयत्न आपण सर्वांनी करायचा आहे.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक साहित्यिक डॉक्टर राजेंद्र माने यांनी केले त्यांनी शाहूपुरी शाखेच्या उपक्रमाबद्दल सांगून ही शाखा महाराष्ट्रातील इतके उपक्रम करणारी एकमेव शाखा आहे असे प्रतिपादन केले.
यावेळी नगरवाचनालयाचे अध्यक्ष अजित कुबेर मंचावर उपस्थित होते
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कार्यवाह वैदेही कुलकर्णी यांनी केले.
आभार प्रदीप कांबळे यांनी मानले .
कार्यक्रमाला डॉक्टर ज्योत्स्ना कोल्हटकर विजयराव पंडित ,प्रकाश शिंदे ,किशोर बेडकीहाळ ,श्रीधर साळुंखे, गौतम भोसले, आनंदा ननावरे, अतुल शालगर , महेश शिवदे,प्रसाद गरगटे सारंग कोल्हापुरे,विशाल देशपांडे, संदीप आठल्ये ,चंद्रकांत बेबले , अमर बेंद्रे ,वजीर नदाफ, सचिन सावंत व इतर म.सा.प शाखेचे सदस्य उपस्थित होते.
फोटोमध्ये विजयराव जोशी यांचे हस्ते
पुरस्कार स्वीकारताना नंदकुमार सावंत सोबत विनोद कुलकर्णी,डॉक्टर राजेंद्र माने,अजित कुबेर,किशोर बेडकीहाळ,वैदेही कुलकर्णी व इतर

