बुधवारी झेंडूची नवी फुले कार्यक्रम
आचार्य अत्रे जयंती निमित्त बंडा जोशी यांचे सादरीकरण
सातारा
येथील दीपलक्ष्मी नागरी सहकारी पतसंस्थेतर्फे आचार्य अत्रे यांच्या जयंतीनिमित्त बुधवार दिनांक १३ ऑगस्ट रोजी झेंडूची नवी फुले हा धमाल विनोद आणि कमाल विडंबन गीतांचा एकपात्री कार्यक्रम सादर करण्यात येणार आहे ज्येष्ठ कलाकार बंडा जोशी हा कार्यक्रम सादर करणार असून त्यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून अशोक इंदलकर, विनोद कुलकर्णी, डॉक्टर संदीप श्रोत्री आणि शिरीष चिटणीस उपस्थित राहणार आहेत दीपलक्ष्मी सांस्कृतिक हॉलमध्ये बुधवार दिनांक 13 ऑगस्ट रोजी सायंकाळी साडेपाच वाजता हा कार्यक्रम होणार असून सर्वांनी या आगळ्या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन दीपलक्ष्मी नागरी सहकारी पतसंस्थेचे चेअरमन शिरीष चिटणीस यांनी केले आहे

