साताऱ्यात शनिवारी मासिक संगीत सभा
यश कोल्हापुरे यांचे शास्त्रीय गायन
Advertisement
सातारा
ऍड अमित द्रविड यांच्या संकल्पनेतून आणि संयोजनातून सुरू झालेल्या मासिक संगीत सभा या उपक्रमामध्ये जुलै 2025 कार्यक्रमाचे पुष्प यश कोल्हापुरे गुंफणार असून त्यावेळी त्यांचे शास्त्रीय गायन सादर होणार आहे शनिवार दिनांक 26 जुलै रोजी सायंकाळी साडेसहा वाजता द्रविड ऑफिस गुरुवार पेठ सातारा येथे ही मासिक संगीत सभा होणार असून यश कोल्हापुरे यांना तानपुऱ्यावर माधव गुरव आणि विजय साळुंखे साथ करणार आहेत संवादिनीवर स्वरा किरपेकर असणार असून तबल्याची साथ अमेय देशपांडे करणार आहेत सर्वांनी या शास्त्रीय गायन कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन ऍड अमित द्रविड यांनी केले आहे

