यशोदा’ च्या रोबोटिक्स उपक्रमाचे जिल्हाधिकाऱ्यांकडून कौतुक


सातारा
यशोदा शिक्षण प्रसारक मंडळाचे संस्थापक अध्यक्ष प्रा. दशरथ सगरे यांनी सातारा जिल्हाधिकारी श्री संतोष पाटील यांची सादिच्छा भेट घेतली.
या भेटीदरम्यान यशोदा टेक्निकल कॅंपस, सातारा येथे सुरु होणाऱ्या प्रगत रोबोटिक्स व आर्टिफिशियल इंटेलिजन्स लॅबोरेटरी संदर्भात त्यांनी माहिती घेतली. जिल्हाधिकारी महोदयांनी या अभिनव उपक्रमाचे विशेष कौतुक करताना सांगितले की, “विद्यार्थ्यांना भविष्यातील तंत्रज्ञानात सक्षम करण्याचा हा उपक्रम निश्चितच प्रेरणादायी आहे.” त्यांनी संस्थेच्या या नवोन्मेषी पावलांचे अभिनंदन केले आणि अशा प्रकारचे उपक्रम ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी फार मोठे मार्गदर्शन करणारे असल्याचे मत व्यक्त केले.
प्रा. दशरथ सगरे यांनी यावेळी जिल्हाधिकारी महोदयांचे कामाचे कौतुक केले आणि भविष्यातील शैक्षणिक उपक्रमांमध्ये जिल्हा प्रशासनाचे सहकार्य लाभावे, अशी अपेक्षा व्यक्त केली.
यशोदा टेक्निकल कॅंपस येथील रोबोटिक्स आणि एआय लॅब ही जिल्ह्यातील विद्यार्थ्यांसाठी भविष्यातील तंत्रज्ञानाच्या दिशेने एक महत्त्वाचे पाऊल ठरणार आहे


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!