‘मदनमोहन: द किंग ऑफ मेलोडी कार्यक्रमाला प्रतिसाद


सातारा
दीपलक्ष्मी पतसंस्था आणि सुहाना सफर ग्रुपने संयुक्तपणे ‘मदनमोहन: द किंग ऑफ मेलोडी’ हा विशेष कार्यक्रम दीपलक्ष्मी सांस्कृतिक सभागृहात सादर केला, जो संगीत दिग्दर्शक मदनमोहन यांना श्रद्धांजली म्हणून सादर करण्यात आला.
कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या सौ. संध्या चौगुले, श्रीरंग जाधव यांच्या हस्ते दीपप्रज्ज्वलन करून कार्यक्रमाची सुरवात झाली. कार्यक्रमाला डॉ.जयंत सरवटे, सौ.सरवटे, डॉ.सानिका इनामदार, डॉ.मंजुश्री पटवर्धन, हेमंत कासार, राजेंद्र पाटील, अरुण कुलकर्णी, ऍड. लक्ष्मीकांत अघोर आणि राजन कुंभार उपस्थित होते.
यावेळी विजय साबळे, डॉ. सुनील पटवर्धन, शिरीष खुटाळे, सचिन शेरकर, मंजुषा पोतनीस, सुषमा बगाडे़, वनिता कुंभार, सीमा रजपूत, ममता नरहरी, कविता शिवकुमार, स्मिता शेरकर, मंजिरी दीक्षित आणि इंद्रायणी कुलकर्णी यांनी मदनमोहनजींची निवडक विविधतापूर्ण सदाबहार गाणी सादर केली.
कार्यक्रमाची सुरुवात “वो भूली दास्तां…” या गाण्याने झाली, त्यानंतर “लग जा गले…”, “आपकी नजरों ने समझा..”, “दिल ढूंँढता है,फिर..”, “कौन आया मेरे मन के द्वारे…”, “फिर वो ही शाम …”, “बैंया ना धरो…”,”हम प्यार में जलने वाले को…”, “माई री मैं कैसे कहूँ …”, “ज़रा सी आहट होती है, तो दिल सोचता है…”, “ऐ दिल मुझे बता दे…”, “झुमका गिरा रे…”, “अगर मुझसे मोहब्बत है…”, “भूली हुई यादों…”, “रस्म-ए-उल्फ़त को निभाएंँ…”, “बेताब दिल की तमन्ना…”, “ना तुम बेवफा हो…”, “नैना बरसे…”, “मिलो ना तुम तो हम घबराएंँ…”, “तुम जो मिल गये हो…”, “इक हसीन शाम को…”, “ज़रूरत है, ज़रूरत है…”, “शोख़ नज़र की बिजलियांँ…”, “इक मंझिल, राही दो…” आणि “दो घड़ी वो जो पास आ बैठे…” अशी अनेक मधुर गाणी सादर झाली
कार्यक्रमाची संकल्पना आणि व्यवस्था विजय साबळे यांची होती. कार्यक्रमाचे निवेदन स्नेहल कुलकर्णी यांनी केले आणि ध्वनी व्यवस्था अक्षता आणि सचिन शेवडे यांची होती


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!