कोणीतरी आहे तेथे …….


एलियन्सच्या अस्तित्वाचा पुरावा सापडला

वॉशिंग्टन
एलियनबाबत प्रत्येकालाच कुतूहल असतं एलियन असतात आणि ते पृथ्वीवरील माणसांच्या संपर्कात असतात असे दावे केले जातात. सायमन हॉलंड नामक नासा फिल्म निर्मात्याने असाच एक दावा केला आहे. पृथ्वीवरील दुर्बिणींच्या मदतीने बुद्धिमान एलियनच्या अस्तित्वाचे अवशेष सापडल्याचा दावा हॉलंड यांनी केला आहे.
सायमन हॉलंड हे बीबीसी आणि नासा यांनी आर्थिक सहकार्य केलेल्या प्रोजेक्ट्सचा भाग म्हणून डॉक्युमेंट्रीज करतात. पृथ्वीवरील दुर्बिणींच्या मदतीने पृथ्वीबाहेर बुद्धिमान एलियनचं अस्तित्व सापडल्याचा दावा त्यांनी केला आहे. त्या अस्तित्वाचे पुरावे एक महिन्याहून कमी काळात प्रसिद्ध केले जातील असंही त्यांनी म्हटलं आहे. या शोधाबद्दल सांगताना हॉलंड म्हणाले, ‘ऑक्सफर्डच्या सहकार्यातून सुरु असलेल्या एका कार्यक्रमाचा भाग म्हणून अलौकिक संकेतांचा शोध घेतला जात आहे. आपल्या आकाशगंगेतील मानवेतर बुद्धिमत्ता ओळखण्याची त्याची क्षमता आहे. हा संकेत म्हणजे रेडिओ तरंगांचा पाच तासांहून जास्त काळ चाललेला स्फोट होता. पृथ्वीपासून सुमारे 4.2 प्रकाशवर्षे दूर असलेल्या प्रॉक्सिमा सेंटॉरीच्या आसपास त्याची निर्मिती झाली असावी असा अंदाज असल्याचं हॉलंड यांनी स्पष्ट केलं. या संकेतांचं विश्लेषण करत असल्याचं ऑक्सफर्डकडून सांगण्यात आलं आहे मात्र त्याच्या संभाव्य स्रोताबाबत माहिती देण्यात आलेली नाही.
हॉलंड म्हणाले, ऑक्सफर्ड याबाबत अधिक संशोधन करत असल्यामुळे अधिक माहिती प्रकाशित करण्यास विलंब होत आहे. 29 एप्रिल 2019 ला हा सिग्नल पहिल्यांदा नोंदवण्यात आला. तेव्हापासून तो नेहमीच चर्चेता विषय ठरला आहे. रेडिओ सिग्नल सध्या कमी प्रमाणात असल्याचं हॉलंड सांगतात. ऑक्सफर्डच्या ‘ब्रेक थ्रू लिसन’ या ना नफा योजनेचा हवाला देऊन हॉलंड म्हणाले, सिग्नल अत्यंत हलक्या स्वरुपाचा आहे आणि त्याचा अभ्यास करताना अनेक तांत्रिक समस्या येत आहेत. मात्र हा सिग्नल एखाद्या एलियन प्रजातीकडून येत आहे, हे निश्चित आहे.

Advertisement

हॉलंड पुढे म्हणाले, आम्हाला आपल्या आकाशगंगेत ऑक्टोबर 2021 मध्ये एक मानवेतर बुद्धिमत्ता आढळली आहे. लोकांना अद्याप याबाबत माहिती नाही. या बुद्धिमत्तेकडून येणारा सिग्नल हा प्रॉक्सिमा सेंटॉरीच्या वरच्या भागातून येत असल्याचा दावा त्यांनी केला आहे. यापूर्वी असे सिग्नल फॉल्स पॉझिटिव्ह असल्याचं स्पष्ट झालं. मात्र आत्ता तसं नाही असं हॉलंड म्हणतात. हा सिग्नल हा ब्रह्मांडातील ध्वनीचा प्रतीध्वनी नाही तर एक संकीर्ण इलेक्ट्रोमॅग्नेटिक स्पेक्ट्रम होता, असा दावाही ते करतात. गुरुवारी त्यांनी सिग्नलचा स्रोत हा एकच बिंदू असल्याचा पुनरुच्चार केला. मानवेतर तांत्रिक हस्ताक्षर पुरावा सापडल्याचंही त्यांनी यावेळी म्हटलं.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!