यशोदा पॉलिटेक्निकला विद्यार्थ्यांची प्रवेशासाठी सर्वाधिक पसंती


केंद्रीभूत प्रवेशाच्या पहिल्या फेरीत उच्चांकी प्रवेश पूर्ण

सातारा
महाराष्ट्रातील नामांकित तंत्रशिक्षण संस्था म्हणून नावारूपाला आलेल्या यशोदा टेक्निकल कॅम्पस, सातारा येथील डिप्लोमा इंजिनिअरिंग प्रवेश प्रक्रियेतील कॅप राउंड १ ला NBA मान्यताप्राप्त अभ्यासक्रम, MSBTE द्वारे मान्यताप्राप्त इंडस्ट्री- हब इन्स्टिट्यूट, इंडस्ट्री स्पॉन्सर्ड लॅब्स, Centre of Excellence, Digital Classrooms, आणि विद्यार्थ्याभिमुख यशोदा पॅटर्न या घटकांमुळे विद्यार्थ्यांनी आणि पालकांनी संस्थेवर विश्वास दाखवला आहे.

Advertisement

यामध्ये संस्थेचे अध्यक्ष प्रा. दशरथ सगरे सर आणि उपाध्यक्ष प्रा. अजिंक्य सगरे सर यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले आहे.
पॉलीटेक्निकचे प्राचार्य डॉ. पी. पी. गावडे सर म्हणाले की, “आधुनिक पायाभूत सुविधा, गुणवत्तापूर्ण शिक्षण आणि रोजगाराभिमुख कौशल्य प्रशिक्षणामुळे यशोदा कॅम्पस सातत्याने जिल्ह्यात अग्रेसर आहे. याच विश्वासातून कॅप राउंड १ मध्ये भरघोस प्रतिसाद मिळाला. संस्थेचा 100% निकाल, 100% प्लेसमेंट, आणि उद्योग-शिक्षण सुसंगत उपक्रम यामुळे यशोदा आज विद्यार्थी आणि पालकांची पहिली पसंती ठरत आहे.”

कॅप राउंड २ आणि संस्था स्तरीय प्रवेशासाठी जागा उपलब्ध असून पात्र विद्यार्थ्यांनी त्वरित संपर्क साधावा असे आवाहन पॉलिटेक्निक प्रवेशप्रमुख प्रा. प्रतिक मतकर यांनी केले,


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!