विनोद कुलकर्णी यांना मराठी भाषा संवर्धक पुरस्कार
राज्य शासनाच्या मराठी भाषा विभागाचे पुरस्कार जाहीर
मुंबई
राज्य शासनाच्या मराठी भाषा विभागाचे पुरस्कार जाहीर करण्यात आले असून सातारा येथे झालेल्या ९९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे कार्याध्यक्ष आणि महाराष्ट्र साहित्त्य परिषदेचे कोषाध्यक्ष विनोद कुलकर्णी यांना मराठी भाषा संवर्धक पुरस्कार जाहीर झाला आहे दोन लाख रुपये रोख , मानचिन्ह व मानपत्र असे पयरपुरस्कराचे स्वरूप असून पुरस्कार प्रदान सोहळा : २७ फेब्रुवारी, २०२६ रोजी विश्व मराठी संमेलन, २०२६ मुख्य मंच, नाशिक येथे होणार आहे.
मराठी भाषा विभागाचे इतर पुरस्कार पुढीलप्रमाणे
साहित्यभूषण पुरस्कार : पद्मश्री डॉ. भालचंद्र नेमाडे
(रु.१० लक्ष रोख, मानचिन्ह व मानपत्र)
विंदा करंदीकर जीवनगौरव : श्रीनिवास विनायक कुलकर्णी
(रु.१० लक्ष रोख, मानचिन्ह व मानपत्र)
श्री.पु भागवत पुरस्कार : निर्मल प्रकाशन, नांदेड
(रु.५ लक्ष रोख, मानचिन्ह व मानपत्र)
मराठी भाषा अभ्यासक पुरस्कार: डॉ. दिलीप धोंडगे
(रु.२ लक्ष रोख, मानचिन्ह व मानपत्र) | व्यक्ती
मराठी भाषा अभ्यासक पुरस्कार: आपटे वाचन मंदिर
(रु.२ लक्ष रोख, मानचिन्ह व मानपत्र) | संस्था
मराठी भाषा संवर्धक पुरस्कार : विनोद नारायण कुलकर्णी
(रु.२ लक्ष रोख, मानचिन्ह व मानपत्र) | व्यक्ती
मराठी भाषा संवर्धक पुरस्कार : कर्नाटक मराठी साहित्य परिषद
(रु.२ लक्ष रोख, मानचिन्ह व मानपत्र) | संस्था

