मंगळवारी भक्तीरंग मराठी गीतांचा कार्यक्रम
सप्तसूर ग्रुप व दीपलक्ष्मी पतसंस्थेतर्फे आयोजन
सातारा
येथील सप्तसूर ग्रुप आणि दीपलक्ष्मी नागरी सहकारी पतसंस्थेतर्फे मंगळवार दिनांक ८ जुलै रोजी ठिक सायंकाळी साडेपाच वाजता आषाढी एकादशीचे औचित्य साधून भक्तीरंग हा मराठी भक्तीगीतांचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे . माउलीच्या भक्तीत लीन होणेकरिता खास भक्तीगीत व अभंगाचा हा कार्यक्रम सप्तसूर ग्रुपचे कलाकार दीपलक्ष्मी सांस्कृतिक हाॅल येथे सादर करणार आहेत यावेळी प्रमुख पाहुणे शिरिष चिटणीस, रविंद्र खांडेकर ,मुकुंद फडके,कैलास मोहिते यांची उपस्थिती असणार आहे यावेळी गायक कलाकार माधवी माने, कैलास मोहिते, चेतन गुरव,प्रशांत मोरे, अजय जगताप, सतीश बोताल कला सादर करतील यावेळी खास आकर्षण म्हणून जानवी दुधगी वय वर्षे १२ (व्हायोलिन वादक) व तबला वादक प्रज्वल जाधव यांची विशेष उपस्थिती असणार आहे. तरी रसिक श्रोते यांनी भक्तीगीत व अभंगाचा आस्वाद घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे

