मनोज कुमार यांनी देशप्रेमाची भावना रुजवली
दीपलक्ष्मी सभागृहात मनोजकुमार यांना संगीत श्रद्धांजली
सातारा
ज्येष्ठ अभिनेते लेखक आणि दिग्दर्शक मनोजकुमार यांनी आपल्या दीर्घ कारकिर्दीमध्ये चित्रपटाच्या माध्यमातून देशप्रेमाची भावना रुजवण्याचे काम केले. दिग्दर्शक म्हणून देश प्रेमाला प्रोत्साहन देणाऱ्या चित्रपटांची मांडणी करताना त्यांनी देशाला सतावणाऱ्या विविध समस्यांचाही उहापोह केला असे प्रतिपादन जेष्ठ पत्रकार मुकुंद फडके यांनी केले
दीपलक्ष्मी सांस्कृतिक सभागृहामध्ये यादे सिने संगीत क्लब आणि दीपलक्ष्मी नागरी सहकारी पतसंस्था यांच्या संयुक्त विद्यमाने मनोज कुमार यांना संगीताच्या माध्यमातून श्रद्धांजली वाहण्याचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.तेव्हा ते बोलत होते
यावेळी व्यासपीठावर ज्येष्ठ संगीत तज्ञ अनिल वाळिंबे ,वासंती घाडगे शिरीष चिटणीस ,मुकुंद पांडे,विजय साबळे ,कैलास मोहिते प्रा. विश्वजित जाधव ,मोहन पुरोहित आदी मान्यवर उपस्थित होते
मुकुंद फडके पुढे म्हणाले, संघर्षमय परिस्थितीमध्ये मनोज कुमार यांनी आपली कारकीर्द घडवली .फाळणीच्या जखमा ताज्या असताना मुंबईत येऊन त्यांनी प्रथम अभिनेता आणि नंतर दिग्दर्शक म्हणून आपली छाप पाडली.शहीद,पुरब और पश्चिम, शोर रोटी कपडा और मकान ,क्रांती अशा अनेक चित्रपटांच्या माध्यमातून त्यांनी भक्तीची आणि देश प्रेमाची भावना रुजवली.शिवाय बेरोजगारी,काळा बाजार,प्रदूषण, ब्रेन ड्रेन अशा अनेक सामाजिक विषयांना हात घातला.
मुकुंद फडके यांनी यावेळी मनोज कुमार यांच्या चित्रपटातील काही प्रसंगांची वैशिष्ट्ये कथन केली.प्रेक्षकांच्या मनाला भिडतील अशा प्रसंगांची निर्मिती करून ते प्रसंग पडद्यावर सादर करण्याचे कौशल्य मनोजकुमार यांच्याकडे होते असेही त्यावेळी मुकुंद फडके यांनी सांगितले
यावेळी मुकुंद पांडे, विजय साबळे, महेश बुटे, आरती वाणी, अरुण कुलकर्णी, विजया चव्हाण, ज्योती साळुंखे शिरिष, चिटणीस यांनी मनोज कुमार यांच्या चित्रपटातील गाजलेली गाणी सादर केली
भारत का रहनेवाला हु भारत की बात सुनाता हु या गाण्याने कार्यक्रमाची सुरुवात झाली आणि एक प्यार का नगमा है या गाण्याने सांगता झाली.
यावेळी ज्येष्ठ संगीत अभ्यासक अनिल वाळिंबे यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला.
या कार्यक्रमाचे निवेदन स्नेहल कुलकर्णी यांनी केले ध्वनीव्यवस्था सुभाष कुंभार यांनी सांभाळली

