बीबीए, बीसीएसाठी अंतिम मुदत २७ जून


सातारा
बी.बी.ए.आणि बी.सी.ए. या व्यावसायिक पदवी प्रवेशासाठी आवश्यक असणारी रिसीईटी ऑनलाईन फाॅर्म भरण्याची अंतीम तारीख आता २७ जून २०२५ पाच वाजेपर्यंत आहे. www.mahacet.org या शासनाच्या वेबसाईटवर फाॅर्म भरता येईल.
इंजिनिअरींग सीईटी परिक्षेत कमी गुण मिळाल्यामुळे इंजिनिअरींगला प्रवेश मिळणार नाही अशा विद्यार्थ्यांना या एआयसीटीई नवी दिल्ली व महाराष्ट्र शासन मान्यता असलेल्या व्यावसायीक पदवीस प्रवेश मिळेल. परंतु अशा विद्यार्थ्यांना बीबीए बीसीए रिसीईटी प्रवेश परिक्षा देणे अत्यावश्यक आहे.
शासनाच्या या रिसीईटी परिक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांनाच प्रवेश मिळणार आहेत व शासनाच्या आर्थिक शिष्यवृत्ती मिळणार आहेत.
बीबीए आणि बीसीए प्रवेशासाठी इच्छुक विद्यार्थ्यांना प्रवेश परिक्षा ऑनलाईन फॉर्म भरण्याची मोफत सोय रयत शिक्षण संस्थेचे वर्ये येथील केबीपी मॅनेजमेंट इन्स्टिट्यूट प्रवेश कक्षात करण्यात आली असल्याचे संचालक डॉ.बी.एस. सावंत यांनी सांगितले.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!