विभागीय कॅरम स्पर्धेत सातारचा सुधीर महापुरे विजेता
कोल्हापूरचा सम्राट लकडे उपविजेता.
कोल्हापूर
पश्चिम विभागीय कॅरम स्पर्धेत सातारचा सुधीर महापुरे विजेता ठरला तर कोल्हापूरचा सम्राट लकडे उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले
महाराष्ट्र कॅरम व कोल्हापूर जिल्हा कॅरम असोसिएशनचे सहकार्याने प्रकाश कॅरम क्लबच्या वतीने घेण्यात आलेल्या सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यातील खेळाडूंच्या स्पर्धा कोल्हापूर जिल्ह्यातील एक उत्कृष्ट कॅरमपटू कै अरविंद गणेश जोशी यांच्या स्मरणार्थ घेणेत आले.या स्पर्धेत साताराचा सुधीर महापुरे यांनी कोल्हापूरचा सम्राट लकडे याचा अत्यंत चुरशीच्या सामन्यात 13/10 / 17/15, 25/6 अशा फरकाने पराभव केला
आणि कै अरविंद जोशी यांच्या स्मरणार्थ ठेवलेल्या चषकाचे मानकरी ठरला यावेळी सुधीरने प्रथम क्रमांकाचे रूपये दहा हजार व चषक मिळवून आपला ठसा उमटविला. तर उपविजेता सम्राट लकडे सातहजार व चषकाचा मानकरी ठरला. तृतीय क्रमांक मानकरी कराडचे जल्लाल मुल्ला यांना चार हजार रुपये व चषक,चतुर्थ क्रमांक मिरजचा आसिफ सिपाई यांनी अनुक्रमे रूपये तीन हजार चषक क्रमांक पाच ते आठ रोहित चौगुले, शुभम पाटील, अख्तर शेख, गौरव हुदले यांना प्रत्येकी एक हजार व चषक देऊन गौरविण्यात आले.
यावेळी अंतिम स्पर्धेची नाणेफेक नितीन सोनटक्के, यांच्या हस्ते व कोल्हापूर जिल्हा कॅरम असोसिएशनचे उपाध्यक्ष राजू मेवेंकरी, विजय जाधव यांच्या उपस्थितीत करण्यात आला उपांत्य फेरीची नाणेफेक अॅड तन्मय ,राजू मेवेंकरी, यांच्या हस्ते करण्यात आली.
बक्षीस समारंभ सामाजिक कार्यकर्ते सतीश सोनटक्के, शिवछत्रपती पुरस्कार विजेते , क्रीडामहर्षी विजय जाधव, नामदेव टमके, सुर्यकांत पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. पंचाचे काम सुर्यकांत पाटील, गौरव हुदले यांनी केले तर बोर्ड रेफरी म्हणून राजू वडर, ओमकार वडर, , संतोष देशपांडे, मंजूर शेख,, अस्लम शेख शिवशंकर भस्मे, यांनी काम पहिले
या स्पर्धा यशस्वी करण्यासाठी प्रकाश क्लबचे नितीन सोनटक्के, अख्तर शेख, सम्राट लकडे, इक्बाल बागवान, गौरव हुदले, सुर्यकांत यांच्या सहकार्याने यशस्वी झाले.स्पर्धेची बक्षिसे राम आहुजा, सतीश सोनटक्के, गणेश मोबाईल, शोभा कामत संतोष कणसे, प्रमोद जोगळेकर,(कै बाबासाहेब दिवसे,कै शोभा दिवसे यांच्या स्मरणार्थ देण्यात आली
यावेळी स्पर्धेसाठी महाराष्ट्र कॅरम असोसिएशनचे सचिव अरुण केदार यांनी सुरको कंपनीचे उत्कृष्ट कॅरम बोर्ड देऊन फार मोठी मोलाची मदत केली.यावेळी स्पर्धेसाठी एकूण 14 कॅरम बोर्ड लावण्यात आले होते.याप्रसंगी कोल्हापूर जिल्हा कॅरम असोसिएशनचे सचिव विजय जाधव यांनी लवकरच सातारा सांगली याठिकाणी तीन जिल्ह्यांतील कॅरम स्पर्धा घेण्यात येणार आहेत असे सांगितले.
फोटो
विजेत्या कॅरमपंटूना बक्षीस देताना सतीश सोनटक्के, विजय जाधव,सुर्यकांत पाटील, नामदेव टमके.