“फुलांचे जंगली प्रदेश” लेखसंग्रहाचे बुधवारी प्रकाशन
लेखिका ऍड. सीमंतिनी नूलकर सादर करणार “रानस्नान ” स्लाईड शो
सातारा –
ज्येष्ठ विधीज्ञ,लेखिका आणि प्रवासी ऍड सीमंतिनी नूलकर यांच्या “फुलांचे जंगली प्रदेश” या ललितनिसर्ग लेखसंग्रहाचे प्रकाशन बुधवार तारीख 9 जुलै 25 रोजी आय एम ए हॉल, पारसनीस कॉलनी, पोवई नाका, सातारा, येथे सायंकाळी 5:30 वाजता होणार आहे.
पुस्तकाचे प्रकाशन डॉक्टर संदीप विठ्ठलराव सांगळे, अध्यक्ष, विद्या परिषद, मराठी साहित्य अभ्यास मंडळ,सावित्रीबाई फुले विद्यापीठ पुणे, ज्येष्ठ समीक्षक लेखक डॉ. देवानंद सोनटक्के, विनोद कुलकर्णी, कोषाध्यक्ष,अखिल भारतीय मराठी साहित्य मंडळ,शिरीष चिटणीस, कार्यवाह , म. सा. प., पुणे यांच्या हस्ते होणार आहे.
याप्रसंगी डॉ. रूपाली शंतनू अभ्यंकर, वाई या पुस्तकातील काही भागाचे अभिवाचन करणार आहेत. तसेच पुस्तकाच्या लेखिका ऍड. सीमंतिनी नूलकर यांचा “रानस्नान “हा स्लाईड शोही होणार आहे
ऍड. सीमंतिनी नुलकर यांची आजपर्यंत बिरिस्ता, सुवर्ण भूमी कंबोडिया,लदाख भारताचा अद्भुत मुकुटमणी, अशी पाच पुस्तक प्रकाशित झालेली आहेत.
ऍड सीमंतिनी नूलकर या मूलतः निसर्ग लेखिका आहेत आणि त्यांनी आजवरच्या भटकंतीत जे जंगली फुलांचे बहर,देश विदेशात अनुभवले, त्याविषयी “फुलांचे जंगली प्रदेश “हे पुस्तक आहे.
या प्रकाशन समारंभास साहित्यप्रेमी, वाचक, रसिक, लेखक,निसर्गप्रेमी,यांनी आवर्जून उपस्थित रहावे असे आवाहन उर्वी बुक क्लब सातारा यांनी केलेले आहे

