एकत्र आलो, एकत्र राहण्यासाठी:उद्धव ठाकरे
मुंबई
बऱ्याच वर्षानंतर राज आणि माझी राजकीय व्यासपीठावर भेट आहे. राज ठाकरेंनी माझा सन्मानीय उद्धव ठाकरे असा उल्लेख केला. मी देखील सन्मानीय राज ठाकरे असा उल्लेख करतो. राज यांनी अतिशय चांगली मांडणी केली आहे. आज आजच्या भाषणा पेक्षा आमच एकत्र दिसणं महत्वाच आहे. आमच्या दोघांतील ‘अंतरपाट’ अनाजी पंतांनी दूर केला. आता अक्षता टाकायची गरज नाही. एकत्र आलो आहे, एकत्र राहण्यासाठी, असं विधान उद्धव ठाकरें यांनी केले आहे
मुंबई येथे झालेल्या विजय मेळाव्यात ते बोलत होते
उद्धव ठाकरें म्हणाले,मला आज कल्पना आहे, अनेक बुवा महाराज बिझी आहे कोण लिंबु कापतय कोण रेडा कापतोय. माझा आजोबांनी या भोंदूपणा विरोधात लढा दिला होता आणि त्यांच्यासाठी आम्ही एकत्र आलो आहे. वापरायचं आणि फेकून द्यायचं, असं यांचं काम आहे. आता आम्ही दोघे तुम्हाला फेकून देऊ. तुमच्या डोक्यावर बाळासाहेब ठाकरे यांचा हात नसतं तर कुठे असता?,
मधल्या काळात यांनी सुरू केले होतं उद्धव ठाकरे यांनी हिंदुत्व सोडलं. अरे आम्ही कडवट देशाभिमानी मराठी हिंदू आहोत, असं उद्धव ठाकरेंनी ठणकावून सांगितले. महाराष्ट्रात मराठी माणूस न्याय मागत असेल आणि तुम्ही त्याला गुंड म्हणत असाल तर आम्ही गुंड आहोत. असं उद्धव ठाकरे म्हणाले.
आम्ही एकत्र येणार म्हंटल की हे भांडण लावतील. अरे आमचा म महापालिकेचा नाही, आमचा म महाराष्ट्राचा आहे, असं उद्धव ठाकरेंनी ठणकावून सांगितले. विधानसभेत बटेंगे तो कटेंगे म्हणाले. हिंदू मुस्लिम तर केलं, परंतु मराठी अमराठी देखील केलं. त्यांनी गुजरात मध्ये एकेकाळी पटेल लोकांना भडकवलं आणि पटेल विरुद्ध बाकी एकत्र केले. राजस्थानमध्ये तेच केलं. जाट समाज भडकवला आणि इतर त्यांच्या विरोधात उभे केले. इथ देखील तेच महाराष्ट्रात केलं मराठा समाजाला भडकवलं आणि बाकी एकत्र केले. बटेंगे तो कटेंगे म्हणाले,असा घणाघात उद्धव ठाकरेंनी केला.

