पाटण तालुक्यात महापाषाणीय लोकांची वसाहत
आंतरराष्ट्रीय स्तरावर एकाश्म दफन स्मारकांचे सादरीकरण
सातारा
जागतिक पुरातत्त्व काँग्रेसद्वारा आयोजित डार्विन ऑस्ट्रेलिया येथे झालेल्या 10व्या आंतरराष्ट्रीय परिषदेत सातारा जिल्ह्यातील पाटण तालुक्यातील एकाश्म दफन स्मारके याविषयावर शोध निबंधांचे सादरीकरण केले गेले,अशी माहिती डेक्कन काँलेज, पुणे येथील पुरातत्व अभ्यासक अनिता आगाशे यांनी दिली
अनिता आगाशे यांनीसांगितले,या जागतिक परिषदेत पश्चिम महाराष्टातील सातारा जिल्ह्यातील पाटण तालुक्यातील महापाषाणीय संस्कृतीचा लोकांची वसाहत व दफने असलेले दाखवून दिले या लोकांच्या दफनांना मेनहीर किंवा एकाश्म दफन स्मारक असे म्हटले जाते मेनहीर म्हणजे मृताचा दफनाचा जागी मोठ्या आकाराची उभारलेली शिळा होय मृतास ज्या जागी दफन केले जाते त्या खड्यात त्याचाबरोबर त्यास पुढचा प्रवासासाठी उपयुक्त धान्य, पाणी, आवडत्या वस्तू, आवडता प्राणी ठेऊन पुरले जात असे त्यावर मोठी शिळा उभी करत बाजून मोठे दगड रचत अशी या दफनांची वैशिष्टपूर्ण रचना असेया संस्कृतीचा लोकांची दफने आपणास प्रामुख्याने विदर्भामधे पाहण्यास मिळतात पश्चिम महाराष्टात ही दफने सहसा आढळत नाहीत तसेच वसाहत आणि दफने एकाच ठिकाणी मिळणे दुर्मिळ असते कारण हे लोक भटके होते
पुरातत्वीय अभ्यासकांच्या मते पश्चिम महाराष्टात या संस्कृतीचा लोकांची दफने पाहण्यास मिळत नाहीत परंतू या परिषदेत सातारा जिल्ह्यातील पाटण तालुक्यात महापाषाणीय संस्कृतीचा लोकांची वसाहत तसेच दफने प्रथमच एकाच ठिकाणी आढळून आली आहेत याचा काळ साधारण इसपू 2 ते 1 ले शतक असा असावा या शोध निबंधाची दखल घेतली गेली सकारात्मक प्रतिसाद मिळाला,असेही त्यांनी स्पष्ट केले
दिनांक 22 ते 26 जून 2025 मध्ये झालेल्या या परिषदेत विविध थीम पैकी Spiritual identities written in landscape या थीमवर आयोजित विभागांमध्ये हा पेपर सादर केला गेला. १९८६ पासून दर चार वर्षांनी आयोजिल्या जाणाऱ्या या जागितक परिषदेचे हे १० वे पुष्प ऑस्ट्रेलियातील फ्लिंडर्स विद्यापीठ आणि डार्विन विद्यापीठ याठिकाणी आयोजित करण्यात आले होते.जगभरातून २००० हून अधिक अभ्यासक, विद्यार्थी आणि प्राध्यापक यांनी उपस्थिती दर्शविलेल्या या जागतिक परिषदमध्ये पुरातत्वशास्त्र विषयातील आधुनिक संशोधन, वारसा संवर्धन व त्यातील अनेक योजना, नवीन तंत्रज्ञानाचा वापर, विविध देशातील पुरातत्वीय उपक्रम, क्षेत्रनिहाय मुद्दे, इ अनेक बाबींवर सखोल चर्चा आणि विनिमय करण्यात आला.
जागतिक पुरातत्त्व काँग्रेस,2025 (World Archaeological Congress) द्वारा आयोजित डार्विन ऑस्ट्रेलिया येथे झालेल्या 10व्या आंतरराष्ट्रीय परिषदेत शोध निबंध सादरीकरणाची संधी मला मिळाली याचा आनंद आहे. या शोध निबंधाद्वारे सातारा जिल्ह्यातील महापाषाणीय संस्कृती संबंधित मिळालेले पुरावे आणि कालखंड अधोरेखित करण्यात आले. आंतरराष्ट्रीय स्तरावर शोध निबंध सादर करताना अनेकांनी केलेल्या सहकार्याबद्दल आभार. त्याचप्रमाणे ज्ञात अज्ञात अनेक मंडळींचे सहकार्य लाभले आहे त्या सर्वांचे अनिता आगाशे यांनी आभार मानले आहेत

