माणिकराव डेरे यांचे निधन
सातारा
कवठे (ता.वाई) येथील ज्येष्ठ नागरिक माणिकराव मुगुटराव डेरे (वय 85) यांचे अल्प आजाराने आज निधन झाले. त्यांच्यामागे एक विवाहित मुलगा, कन्या नातवंडे आहेत.माणिकराव डेरे सुरुवातीच्या काळात पुणे खरेदी विक्री संघाच्या सेवेत सेवेत होते. तदनंतर ते किसन वीर सातारा सहकारी साखर कारखान्यात रुजू झाले. त्यांनी सलग 45 वर्ष साखर विक्री विभागात प्रभावी काम केले. दिलखुलास स्वभावामुळे कारखाना परिवारात ते लोकप्रिय होते.

