शनिवारी पावसावरील गाण्यांचा मेघमल्हार कार्यक्रम
दीपलक्ष्मी पतसंस्था आणि माय बिट्स स्टुडिओतर्फे आयोजन
सातारा
येथील दीपलक्ष्मी नागरी सहकारी पतसंस्था आणि माय बिट्स स्टुडिओ यांच्या संयुक्त विद्यमाने शनिवार दिनांक पाच जुलै रोजी सायंकाळी साडेपाच वाजता दीपलक्ष्मी सांस्कृतिक हॉल येथे मेघ मल्हार हा पावसावर आधारित हिंदी मराठी गीतांचा बहारदार कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमाची संकल्पना व संयोजन डॉक्टर लियाकत शेख यांची असून निवेदन चित्रा भिसे करणार आहेत.यावेळी वनिता कुंभार, मंजिरी दीक्षित, कल्याणी इनामदार,इंद्रायणी कुलकर्णी, चित्रा भिसे,डॉ लियाकत शेख, डॉ. वाय पी चव्हाण, अल्ताफ मुल्ला, जलीलशेख, मनोज सावंत गाणी सादर करणार आहेत
या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून मृणालिनी कोळेकर, मनोहर देशमुख, सुनील साबळे, राजेंद्र सप्रे, शिरीष चिटणीस, आणि डॉक्टर लियाकत शेख उपस्थित राहणार आहेत
कार्यक्रमाची ध्वनी संयोजनाची जबाबदारी सचिन शेवडे,अक्षदा शेवडे सांभाळणार आहेत
या कार्यक्रमाचा लाभ संगीत रसिकांनी घ्यावा असे आवाहन शिरीष चिटणीस लियाकत शेख़ यांनी केले आहे.

