वार्षिक राशिभविष्य 2025:सिंह
वार्षिक राशिभविष्य 2025
2025 च्या पोटात काय दडले असेल याची उत्सुकता सगळ्यांना असेल पुढील वर्षी शनी महाराज 29 मार्च 2025 रोजी कुंभ राशीतून मीन राशीत प्रवेश करतील त्यामुळे मकर राशीची साडेसाती संपत असून मेष राशीची साडेसाती सुरू होईल 14 मे 2025 रोजी गुरुचा मिथुन राशीत प्रवेश होईल तसेच 18 मे 2025 रोजी राहू आणि केतू यांचाही राशी बदल होईल राहू मीनेतून कुंभ राशीत प्रवेश करेल तर केतू कन्येतून सिंह राशीत प्रवेश करील वार्षिक भविष्य पाहताना वरील मुख्य ग्रहांचे राशी बदल आणि इतर सर्व ग्रहांचे गोचर पाहून राशिफल तयार होते
सिंह
वर्षाची सुरुवात साधारण
सिंह राशीच्या व्यक्तींना वर्षाची सुरुवात थोडी साधारण होईल पण जसजसे महिने पुढे जातील तसतशी त्यांच्या प्रगतीत वाढ होत जाईल ज्या व्यक्तींना प्रदेशात जाऊन पश्चाताप झालाय किंवा योग्य प्रकारची नोकरी मिळाली नाही असे लोक आपल्या देशात घरी परत येतील ज्यांच्या कुटुंबात थोडी धुसफूस चालू होती ती पण कमी होईल काहींच्या कुटुंबात खूप आनंदाचे वातावरण राहील मुलांच्या आरोग्याकडे मात्र योग्य ते लक्ष द्यावे लागेल मुलांच्या दिनचर्येत नियमितता ठेवावी लागेल म्हणजे ती अभ्यासाकडे दुर्लक्ष करणार नाहीत जे विद्यार्थी खूप वर्षापासून तयारी करत आहेत त्यांना यावर्षी यश मिळेल अनेकांना मनासारखी नोकरी मिळेल व्यवसायात पार्टनरशी मतभेद होऊ शकतात परंतु त्यांच्याशी बोलून संवाद साधून परिस्थिती नियंत्रणात येऊ शकते नोकरदारांना फेब्रुवारी आणि मार्च महिन्यात कार्यक्षेत्रात चांगले यश मिळेल अनेकांना मानसन्मान मिळेल या काळात शेअर बाजारात जास्त गुंतवणूक करू नका प्रेमी जीवनात संबंध मधुर राहतील अनेक जण कुटुंबाच्या विरोधात जाऊन विवाह करतील एप्रिल महिन्यात स्वतःच्या आरोग्याकडे जास्त लक्ष द्यावे लागेल या महिन्यात कोणालाही पैसे उधार देऊ नका 29 मार्च 2025 रोजी शनी मीन राशीत प्रवेश करेल त्या दिवसापासून तुम्हाला शनीची दह्या किंवा छोटी साडेसाती सुरू होईल ही दह्या अडीच वर्षे असेल शनीचे अष्टमस्थानातून भ्रमण सुरू होईल काही जणांना यामुळे शारीरिक त्रास होतील. या काळात जर तुम्ही कोणाला पैसे दिले तर ते परत मिळण्याची शक्यता खूप कमी असेल अनेकांना आपल्या कामात यश मिळणार नाही अनेक अडचणी येतील वात संबंधी अनेक आजाराने त्रास होऊ शकतो 14 मे 2025 रोजी गुरुचे भ्रमण मिथुन राशीतून होईल तुमच्या लाभस्थानातून होणारे गुरुचे गोचर तुमच्यासाठी अतिशय शुभकारक आहे या काळात तुम्ही जिथे गुंतवणूक कराल तिथून तुम्हाला धनप्राप्ती होईल नोकरदारांना उच्चपद किंवा प्रमोशन मिळेल शत्रूवर विजय मिळवाल संततीची प्रगती होईल लहान भावंडांशी संबंध चांगले होतील 30 मे रोजी राहू आणि केतू यांचेही राशी परिवर्तन होणार आहे राहू कुंभ राशीत तर केतू तुमच्याच म्हणजे सिंह राशीत प्रवेश करील राहूच्या सप्तमातील गोचरामुळे काही व्यावसायिकांना लाभ होईल सिंह राशीसाठी जानेवारी एप्रिल मे आणि ऑगस्ट हे महिने काहीसे आव्हानात्मक असतील

