शनिवारी मासिक संगीत सभा
तबला सोलो वादन आणि शास्त्रीय गायन
सातारा
ऍड अमित द्रविड यांच्या संकल्पनेतून सुरु झालेल्या मासिक संगीत सभा उपक्रमात जून 2025 या महिन्याचे सत्र शनिवार दि. 28 जून 2025 सायंकाळी 6 वाजता द्रविड ऑफिस, गुरुवार पेठ, सातारा 415002 येथे होणार आहे
प्रथम सत्रात सुधीर पाध्ये यांचे शिष्य चैतन्य अमित पटवर्धन तबला सोलो वादन सादर करणार आहेत द्वितीय सत्रात विदुषी मंजुषा पाटील व पं. श्री. कृष्णा मुखेडकर यांचे शिष्य अर्जुन यादव शास्त्रीय गायन सादर करतील तबला साथ अमेय देशपांडे देणार असून संवादिनी साथ स्वरा किरपेकर देतील या संगीत सभेचा लाभ रसिकांनी घ्यावा असे आवाहन ऍड अमित द्रविड

