रविवारी शंकर जय किशन हिट्स
दीपलक्ष्मी पतसंस्था आणि आम्ही आनंदयात्रीतर्फे आयोजन
सातारा
येथील दीपलक्ष्मी नागरी सहकारी पतसंस्था व आम्ही आनंदयात्री यांच्यातर्फे रविवार दिनांक 29 जून रोजी सायंकाळी सहा वाजता दीपलक्ष्मी सांस्कृतिक हॉल येथे शंकर जय किशन हिट्स हा गाण्यांचा कार्यक्रम सादर होणार आहे
या कार्यक्रमाची संकल्पना डॉक्टर अनुराधा पांडे यांची असून दिग्दर्शन मुकुंद पांडे यांचे आहे यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून शिल्पा चिटणीस ,अनिल वाळिंबे, विजय आवळे, धीरेंद्र राजपुरोहित, मुकुंद फडके, हेमंत कासार, प्रमोद लोंढे आणि मुकुंद पांडे उपस्थित राहणार आहेत
यावेळी प्रसिद्ध संगीतकार शंकर जय किशन यांच्या अनेक मेलोडीयस गाण्यांचे सादरीकरण गायक कलाकार ऍड लक्ष्मीकांत अघोर, प्रशांत कुलकर्णी, अरुण कुलकर्णी, ऍड आशुतोष वाळिंबे, प्रिया अघोर, ऍड रेश्मा वाळिंबे, मधु गिजरे, विजया चव्हाण आणि मुकुंद पांडे करणार आहेत
कार्यक्रमाचे निवेदन ऍड स्नेहल कुलकर्णी करणार असून ध्वनी व्यवस्था सचिन शेवडे पाहणार आहेत सर्वांनी या गाण्यांच्या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन आयोजकांतर्फे करण्यात आली आहे

