शशिकांत शिंदे अडचणीत


आर्थिक फसवणूक प्रकरणी गुन्हा दाखल

Advertisement

मुंबई :
महाविकास आघाडीचे सातारा लोकसभेचे उमेदवार शशिकांत शिंदे यांच्यावर आर्थिक फसवणूक केल्याचा गुन्हा दाखल आहे. शौचालय घोटाळ्याचा गुन्हा दाखल असतानाच एफएसआय प्रकरणात दुसरा गुन्हा दाखल झाल्याने शशिकांत शिंदे यांना कोणत्याही क्षणी अटक होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
एपीएमसी पोलीस ठाण्यात 24 संचालक आणि सचिव असे 25 जणांविरोधात गुन्हा दाखल आहे. मसाला मार्केटमधील 466 गाळे धारकांना जादाचा एमएसआय देताना एपीएमसी प्रशासनाचे 65 कोटी रूपयांचे नुकसान केल्यामुळे हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 2009 साली मसाला मार्केट मधील 466 गाळेधारकांना जादाचे बांधकाम करण्यासाठी 600 रूपये प्रति चौरस फुटाने परवानगी त्या वेळच्या संचालक मंडळाने दिली होती. रेडीरेकनरचा दर 3066 रूपये असताना फक्त 600 रूपये आकारले गेल्याने शासनाचे 62 कोटी रूपयांचे नुकसान झाल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे.
याप्रकरणी शासनाने त्या वेळच्या संचालक मंडळातील 24 संचालक आणि सचिव असे 25 जणांवर आर्थिक फसवणूक केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वाशीतील मुंबई कृषि उत्पन्न बाजार समितीच्या 24 संचालक आणि सचिव असे 25 जणांवर एपीएमसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी शशिकांत शिंदे सह इतर संचालकांवर अटकेची टांगती तलवार आहे, अशी मोठी बातमी समोर आली आहे.
नवी मुंबई एपीएमसी फळ मार्केट शौचालय टेंडर घोटाळ्या प्रकरणी शशिकांत शिंदे यांना अंतरिम जामीन मिळाला आहे. संचालक संजय पानसरे यांना अटक झाली आहे, तर इतर संचालकांवर अटकेची तांगती तलवार आहे. याप्रकरणी सातारा लोकसभेचे उमेदवार शशिकांत शिंदे यांनी दोन महिन्यांपूर्वी अंतरिम जामीन घेतल्याने त्यांची अटक टळली आहे. वाशी येथील कृर्षी उत्पन्न बाजार समिती मध्ये असलेले सार्वजनिक शौचालय घोटाळा प्रकरणी फळ मार्केटचे संचालक संजय पानसरे यांना अटक करण्यात आली आहे. क्राईम ब्रॅन्चकडून संजय पानसरे यांना अटक झाली असून इतरही संचालकांवर अटकेची टांगती तलवार आहे


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!