डॉ. महेश खरात यांच्या या कवितासंग्रहाचे आज प्रकाशन
सातारा
दीपलक्ष्मी नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित सातारा यांच्या वतीने बुर्गांट या गाजलेल्या कादंबरीचे लेखक डॉ. महेश खरात यांच्या “तुझ्या नावासमोर प्रिय लिहिताना” या कवितासंग्रहाचे प्रकाशन मराठीतील सुप्रसिद्ध समीक्षक व रयत शिक्षण संस्थेचे सहसचिव प्राचार्य डॉ. शिवलिंग मेनकुदळे यांच्या हस्ते
दिनांक 25 जून 2025 रोजी सायंकाळी 5.30 वाजता सातारा येथील दीपलक्ष्मी पतसंस्थेच्या हॉलमध्ये संपन्न होत आहे. प्रकाशन सोहळ्यासाठी प्रमुख पाहुणे म्हणून अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे कोषाध्यक्ष विनोद कुलकर्णी हे असणार आहेत.छत्रपती संभाजीनगर येथील सुप्रसिद्ध उद्योजक व अर्थतज्ज्ञ आणि लेखक डॉ. डी. एस.काटे हे या प्रकाशन सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी राहतील. पुस्तकावर मराठीतील नव्या पिढीचे उत्तम समीक्षक डॉ. देवानंद सोनटक्के तसेच लेखिका व पर्यावरण तज्ज्ञ ऍड.सीमंतिनी नूलकर व सातारा येथील समीक्षक अभ्यासक डॉ.मृणालिनी पवार हे भाष्य करणार आहेत.
महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कार्यवाह सन्माननीय शिरीष चिटणीस हे प्रास्ताविक करतील.
सूत्रसंचालन डॉ. संतोष देशमुख हे करणार आहेत.तर आभार हनुमंत सोनवणे मानतील.सदर कार्यक्रमासाठी आपण उपस्थित रहावे असे आवाहन शिरीष चिटणीस यांनी केले आहे.

