काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष देशमुख शनिवारी सूत्रे स्वीकारणार


मान्यवरांची उपस्थिती; सरकारच्या निषेधार्थ ‘मशाल मोर्चा ‘

सातारा
सातारा जिल्हा काँग्रेसचे नवनियुक्त अध्यक्ष रणजितसिंह देशमुख यांचा पदग्रहण समारंभ तसेच संविधान आणि लोकशाही मूल्ये पायदळी तुडवणाऱ्या राज्य सरकारच्या निषेधार्थ येत्या शनिवारी (दि.१४) दुपारी तीनला मशाल मोर्चा काढण्यात येणार आहे.

ज्येष्ठ नेते माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, विधान परिषदेतील गटनेते सतेज ऊर्फ बंटी पाटील ,आमदार विश्वजीत कदम , डॉ. इंद्रजित मोहिते यांच्या विशेष उपस्थितीत हा पदग्रहण समारंभ आणि मशाल मोर्चा काढण्यात येणार आहे.

Advertisement

जिल्हा काँग्रेसचे ज्येष्ठ नेते – खजिनदार बाबासाहेब कदम यांनी यासंदर्भात प्रसिद्धी दिलेल्या पत्रकात म्हटले आहे, की शनिवारी दुपारी तीन वाजता काँग्रेस भवनात नूतन अध्यक्ष देशमुख यांचा पदग्रहण समारंभ होईल. यानंतर उपस्थित मान्यवर नेत्यांची पत्रकार परिषद होऊन राज्य सरकारच्या निषेधार्थ मशाल मोर्चाला सुरुवात होईल.
राज्यात झालेल्या विधानसभा निवडणूक प्रक्रियेची न्यायालयीन चौकशीची मागणी पक्षातर्फे होत असतानाच दरम्यानच्या काळात राज्य सरकारकडून भारतीय संविधानाची आणि लोकशाही मूल्यांची पायमल्ली होत आली आहे. त्याच्या निषेधार्थ मशाल मोर्चा काढण्यात येणार आहे. मान्यवर नेत्यांच्या उपस्थितीत हा मशाल मोर्चा काँग्रेस भवन ते पोवई नाका मार्गे राजवाडा ,असा निघणार असून राजवाड्यासमोरील गांधी मैदानात छत्रपती प्रतापसिंह महाराजांच्या पुतळ्याजवळ या मोर्चाचे विसर्जन होईल.
या कार्यक्रमास काँग्रेस कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन श्री. कदम यांनी या पत्रकाद्वारे केले आहे


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!