यशोदा कॉलेज ऑफ आर्किटेक्चर मध्ये ‘ यशो आर्टफेस्ट २०२५’


कला, वास्तुकलेचा व संस्कृतीचा एक भव्य सोहळा आजपासून खुला

सातारा
यशोदा कॉलेज ऑफ आर्किटेक्चर सातारा हे यंदा आपली १० वी वर्षपूर्ती मोठ्या उत्साहात साजरी करत असून, त्यानिमित्ताने ‘यशो आर्टफेस्ट २०२५’ या चार दिवसीय वास्तु कला महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. हा महोत्सव १३ जून ते १६ जून २०२५ दरम्यान यशोदा टेक्निकल कॅम्पस मध्ये पार पडणार आहे.
या कार्यक्रमात आर्किटेक्चर विद्यार्थ्यांची सर्जनशीलता व कलागुण विविध माध्यमातून सादर होणार आहेत. यात आर्किटेक्चरल मॉडेल्स, डिझाईन्स, आर्ट इन्स्टॉलेशन्स, रांगोळी डिझाइन्स, गड-किल्ल्यांची प्रतिकृती, चित्रकला व छायाचित्रण यांचा समावेश आहे. हे प्रदर्शन सकाळी १०:०० ते सायंकाळी ५:०० वाजेपर्यंत सर्वांसाठी खुले असणार आहे.
यशो आर्टफेस्टचे उद्घाटन १३ जून रोजी सकाळी ११:०० वाजता प्रख्यात वास्तुविशारद आर्किटेक्ट माधव जोशी यांच्या हस्ते होणार आहे. यावेळी IIA (इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ आर्किटेक्ट्स), IIID (इन्स्टिट्यूट ऑफ इंडियन इंटीरिअर डिझायनर्स), CREDAI (कॉन्फेडरेशन ऑफ रिअल इस्टेट डेव्हलपर्स असोसिएशन्स ऑफ इंडिया), आणि BAI (बिल्डर्स असोसिएशन ऑफ इंडिया) यांसारख्या नामवंत संस्थांचे मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
पूर्वसंध्येच्या कार्यक्रमांतर्गत, YCA मध्ये ९ व १० जून रोजी बांबू वर्कशॉप आयोजित करण्यात आले होते, ज्याचे मार्गदर्शन आर्किटेक्ट अथर्व घोगळे यांनी केले. यामध्ये विद्यार्थ्यांसह माजी विद्यार्थी व व्यावसायिकांनी भाग घेतला. बांबूच्या साहाय्याने बांधकामाच्या पारंपरिक व शाश्वत तंत्रांचा अनुभव यामध्ये घेता आला. वर्कशॉपमध्ये तयार करण्यात आलेली कलाकृती आता प्रदर्शनात पाहायला मिळणार आहे

Advertisement

या प्रकारच्या कार्यक्रमांचे व विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाचे महत्व अत्यंत मोलाचे आहे. ‘यशो आर्टफेस्ट’सारख्या उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांना केवळ पुस्तकी ज्ञानापुरते मर्यादित न राहता, त्यांची सर्जनशीलता, कल्पनाशक्ती, टीमवर्क, आणि प्रकल्प व्यवस्थापन कौशल्ये विकसित होतात. या व्यासपीठावरून ते आपली कला, वास्तुकलेचे दृष्टिकोन व सादरीकरण कौशल्य समाजासमोर मांडू शकतात. अशा उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांमध्ये स्वतंत्र विचार करण्याची क्षमता, आत्मविश्वास आणि व्यावसायिक जाणिवा निर्माण होतात. याचबरोबर, विविध क्षेत्रातील तज्ज्ञ व मान्यवरांची उपस्थिती विद्यार्थ्यांना मार्गदर्शन व प्रेरणा देण्याचे काम करते, जे त्यांच्या व्यावसायिक भविष्यासाठी अत्यंत उपयुक्त ठरते.

आर्टफेस्टच्या तयारीदरम्यान रांगोळी स्पर्धा आणि गड बनवा स्पर्धा घेण्यात आल्या, ज्यामध्ये विद्यार्थ्यांनी उत्साहाने सहभाग घेतला. या स्पर्धांमुळे कॅम्पसात चैतन्य निर्माण झाले आणि पारंपरिक कलेचे दर्शन घडले. यशो आर्टफेस्ट २०२५ मध्ये सहभागी होऊन विद्यार्थ्यांच्या कलेला, संस्कृतीला आणि वास्तुशिल्पाला सलामी देण्यासाठी यशोदा कॉलेज ऑफ आर्किटेक्चर च्या वतीनेआवाहन करण्यात आले आहे.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!