डॉ संदीप श्रोत्री यांचा रविवारी सत्कार
वाढदिवसानिमित्त गाण्यांचा विशेष कार्यक्रम
सातारा
गेली तीन दशके वैद्यकीय, सामाजिक, साहित्यिक, निसर्ग आणि पर्यावरण, गिर्यारोहण या विविध क्षेत्रात आपला ठसा उटवणारे डॉक्टर संदीप गजानन श्रोत्री यांच्या वयाला साठ वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने विविध संस्थांच्या पुढाकाराने त्यांचा सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला आहे
पारसनीस कॉलनी येथील आयएमए हॉलमध्ये रविवार दिनांक 1 जून रोजी सायंकाळी पाच वाजता हा सत्कार समारंभ होणार आहे येथील आम्ही पुस्तक प्रेमी समूह, रानवाटा निसर्ग आणि पर्यावरण संवर्धन मंडळ आणि दीपलक्ष्मी नागरी सहकारी पतसंस्था यांच्या संयुक्त विद्यमाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे या सत्कार सोहळ्याला प्रमुख पाहुणे म्हणून जेष्ठ शल्यचिकित्सक आणि राजहंस प्रकाशनचे संपादक डॉक्टर सदानंद बोरसे आणि राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त ज्येष्ठ गिर्यारोहक उमेश झिरपे उपस्थित राहणार आहेत
या सत्कार सोहळ्याच्या निमित्ताने साहित्यिक भारतरत्न लता मंगेशकर यांच्या जीवनावर आधारित खास गाण्यांचा कार्यक्रमही आयोजित करण्यात आला आहे या कार्यक्रमाची संकल्पना, संहिता आणि सादरीकरण प्रदीप देसाई यांचे असून यावेळी मुंबई येथील कश्मिरा राईलकर आणि सातारचे गायक डॉक्टर सुनील पटवर्धन हे साथ देणार आहेत
या कार्यक्रमाला सर्वांनी उपस्थित रहावे असे आवाहन सर्व संबंधित संस्थांतर्फे विनोद कुलकर्णी, शिरीष चिटणीस, श्रीराम नानल, पुरुषोत्तम पाटील, मानसी वैद्य, जयंत देशपांडे, श्रीकांत कात्रे, विनायक भोसले आणि मुकुंद फडके यांनी केले आहे

