नीता अंबानींचा सोन्याचा ब्लाऊज


वरमाईने परिधान केलेल्या लेहेंगा-चोली लुकची चर्चा
मुंबई

Advertisement

अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांच्या विवाह सोहळ्याला अवघे काही तास शिल्लक राहिले आहेत. १२ जुलै ला मुंबईमध्ये त्यांचा विवाह सोहळा पार पडणार आहे.या विवाह या सोहळ्यातील अंबानी कुटूंबियांचे लुक चर्चेचा विषय बनले आहेत.अनंत राधिकाच्या विवाह सोहळ्यापूर्वीच्या विधींना सुरुवात झाली आहे. या सर्व सोहळ्यांमध्ये नवरीमुलीपेक्षा वरमाईचे लुक अधिक चर्चेत आहेत. काल संध्याकाळी अनंत राधिका यांच्यासाठी विशेष पूजेचे आयोजन करण्यात आले होते.या पूजेतील नीता अंबानी यांच्या लूकचे नेटकऱ्यांनी कौतुक केले आहे.
६० वर्षीय नीता अंबानींचे अनंत राधिकाच्या लग्नातील सर्वच लुक सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. अनंत राधिकाच्या विशेष पूजेसाठी नीता अंबानी यांनी प्रसिद्ध डिझायनर अबू जानी संदीप खोसला यांनी तयार केलेला डिझाईन लेहेंगा-चोली परिधान केला होता. ज्यावर त्यांनी सोन्याच्या जरीवर्कसोबतच मिरर वर्क असलेले ब्लाऊज परिधान केले होते. हिरव्या आणि निळ्या रंगाच्या लेहंग्यावर नीता अंबानी अधिक सुंदर दिसत होत्या.
नीता अंबानी यांनी परिधान केलेल्या ब्लाऊजवर सुबक नक्षीकाम करण्यात आले होते. जणू काही त्यांनी सोन्याचा ब्लाऊज परिधान केला आहे, असा लुक दिसत होता. या पूजा सोहळ्यात नीता अंबानी मुलगी आणि सूनेपेक्षा अधिक सुंदर दिसत होत्या. नीता अंबानी यांनी परिधान केलेल्या ब्लाऊजला गोल नेकलाईन तयार करण्यात आली होती. ज्यामध्ये सोन्याच्या तारांचे वर्क करण्यात आले आहे. लेहेंगा-चोळीला मॅचिंग होईल अशी ज्वेलरी त्यांनी परिधान केली होती. त्यामध्ये त्यांनी डायमंड, पन्ना आणि रूबीचे दागिने घेतले होते. तर हातामध्ये हिऱ्याच्या बांगड्या घातल्या होत्या.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!