साताऱ्यात रविवारी मदनमोहन यांच्या गीतांचा कार्यक्रम
सातारा
कला सरगम या संस्थेतर्फे रविवार दिनांक १ जून रोजी सायं. ६ ते ९ या वेळेत शाहू कला मंदिर येथे मेरी आवाज सुनो हा मदन मोहन यांनी संगीतबद्ध केलेल्या गीतांचा लाइव्ह कार्यक्रम आयोजित केला आहे. सदर कार्यक्रमात पूजा सर्वटे – जठार ( पुणे ), शर्वरी काशीद, माणिक सर्वटे, डॉ. जयंत सर्वटे, डॉ. निकित सर्वटे आणि डॉ. सुनील पटवर्धन हे कलाकार स्वरसाज चढवणार आहेत. या कार्यक्रमात केदार परांजपे ( सिंथेसायझर ), रमाकांत परांजपे ( व्हायोलिन ), स्वरा किरपेकर ( हार्मोनियम ), शांताराम दयाळ ( तबला ), अजय भोगले ( ऑक्टोपॅड ), प्रशांत दयाळ ( ढोलक ), ऍड आशुतोष वाळिंबे ( तालवाद्य ) हे कलाकार साथ संगत करणार आहेत. संगीत संयोजन हे राजेंद्र आफळे यांचे असून कार्यक्रमाचे संयोजन हे अनिल वाळींबे यांचे आहे. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ऍड रेशमा वाळींबे या करणार असून, ध्वनी व्यवस्था सचिन शेवडे यांची आहे.
कार्यक्रम सर्वांना विनामूल्य असून सर्व सातारकर रसिकांनी या गीतांचा आनंद घ्यावा असे आवाहन संयोजकांनी केलेले आहे.