शनिवारी पश्चिम विभागीय कॅरम स्पर्धा
कै अरविंद गणेश जोशी यांच्या स्मरणार्थ आयोजन
कोल्हापूर
प्रकाश कॅरम क्लब उमा चौक व कोल्हापूर जिल्हा कॅरम असोसिएशनचे मान्यतेने पश्चिम विभागीय कॅरम स्पर्धा दिनांक शनिवार 24 आणि रविवार 25 मे 2025 रोजी होणार आहेत.ही स्पर्धा कोल्हापूर येथील मंगळवार पेठेतील सनगर गल्ली तालीम या ठिकाणी सकाळी 10 वाजता सुरू होणार आहेत.
या स्पर्धेसाठी सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर जिल्ह्यातील सुमारे 150 कॅरमपंटू सहभागी होत आहेत.
या स्पर्धेसाठी एकूण रोख बक्षिसे 40000 रुपये व 14 कॅरम बोर्ड लावले जाणार आहे. तसेच प्रथम ब्रेक टू फिनीश व ब्लँक टू फिनीश करणारे कॅरमपंटूना सम्राट लकडे व गौरव हुदले यांचे मार्फत रूपये 300 देण्यात येणार आहेत .
प्रथम क्रमांक रूपये 10000 द्वितीय क्रमांक रूपये 7000 तृतीय क्रमांक रूपये 4000 चतुर्थ क्रमांक रूपये 3000 क्रमांक पाच ते आठ यांना प्रत्येकी एक हजार रुपये अशी बक्षिसे देण्यात येणार आहेत
या स्पर्धेसाठी प्रकाश कॅरम क्लब ,बच्चू पाटील कॅरम अॅकेडमी,सचिन क्लबचे कार्यकर्ते यांचे सहकार्य लाभले आहे अशी माहिती असोसिएशनचे सचिव विजय जाधव यांनी दिली