मला हनीट्रॅपमध्ये फसविण्यात आलं


पत्नीच्या आरोपानंतर पंकज तडस यांची प्रतिक्रिया
नागपूर

Advertisement

वर्ध्यातील लोकसभा मतदारसंघातील भाजपचे उमेदवार रामदास तडस यांच्या घरातील कौटुंबीक वाद उफाळून आला आहे. लोकसभा निवडणुकीदरम्यान रामदास तडस यांच्या सुनेने त्यांच्या सुपुत्रावर गंभीर आरोप केले आहेत. पत्नी पूजा तडस यांनी पत्रकार परिषदेतील गंभीर आरोपावर पंकज तडस यांनी मला हनीट्रॅपमध्ये फसविण्यात आलं अशी प्रतिक्रिया दिली आहे.
रामदास तडस यांच्या सून पूजा तडस यांनी भरपत्रकार परिषदेत कौटुंबीक छळाचा आरोप त्यांच्या पतीवर केला. यावेळी पत्रकार परिषदेत ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे देखील उपस्थित होत्या. पत्नी पूजा तडस यांच्या आरोपावर पती पंकज तडस म्हणाले की, ‘सुसंकृत लोक पहिले घराचा तमाशा बाहेर काढत नाही. सुषमा अंधारे यांच्यासोबत पत्रकार परिषद घेतली, त्या कोणत्या पक्षाच्या आहेत. यात राजकारण का घुसलं? पत्नीने केलेले सर्व आरोप चुकीचे आहेत. मला हनीट्रॅमध्ये फसविण्यात आलं होतं. याबाबत न्यायालयात प्रकरण सुरु आहे.
‘न्यायलयात हजर राहण्यासाठी वेळ नाही. पण मीडियासमोर बोलायला वेळ आहे. सदर प्रकरण न्यायप्रविष्ट असल्याने यावर मी जास्त बोलणार नाही. सुषमा अंधारे यांच्या बुद्धीत अंधार आहे. स्वतःच्या घरातील अंधार अंधारे पाहू शकत नाही. या प्रकरणाचे माझ्याकडे अनेक पुरावे आहेत, असे तडस पुढे म्हणाले.
रामदास तडस यांनी सुनेच्या आरोपावर प्रतिक्रिया देताना म्हटलं त्यांची कोर्टामध्ये केस सुरू आहे. ते दोघे एकत्र आले, तर मी बाप म्हणून स्वीकारेल. डीएनए टेस्टची मागणी दोघांनी केली होती. जेव्हा कोर्ट निकाल देईल ते समोर येईल. माझी उमेदवारी रद्द करावी हे षडयंत्र आहे. महाविकास आघाडीच्या पायाखालची वाळू आता घसरली आहे. ते दोघे एकत्र आले तर, मी स्वीकारायला तयार आहे,


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!